जंगलात 2 किमी पाठलाग करुन एनसीबीने नायजेरीअन नागरिकाला पकडलं, 20 लाखाचे ड्रग्ज जप्त

0 झुंजार झेप न्युज

मुंबईच्या अंमली पदार्थविरोधी विभागाने (NCB Arrested Nigerian Citizen) नवी मुंबईत एक मोठी कारवाई पार पाडली आहे. पथकाने तब्बल 20 लाख रुपये किमतीचे 200 ग्रॅम मेफेड्रोन जप्त केलं आहे.

नवी मुंबई : मुंबईच्या अंमली पदार्थविरोधी विभागाने (NCB Arrested Nigerian Citizen) नवी मुंबईत एक मोठी कारवाई पार पाडली आहे. पथकाने तब्बल 20 लाख रुपये किमतीचे 200 ग्रॅम मेफेड्रोन (Mephedrone Drug) जप्त केलं आहे. याप्रकरणी पथकाने एका नायजेरीअन नागरिकाला अटक केली आहे. त्याला एनडीपीएस कलमाखाली अटक करण्यात आली आहे 

20 लाखाचे ड्रग्ज जप्त

नवी मुंबईत अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या नायजेरीयन नागरिकाला मुंबईच्या अंमली पदार्थविरोधी विभागाच्या पथकाने रविवारी (28 मार्च) दोन किलोमीटर पाठलाग करुन पकडले. केनिथ इझी (वय 32) असे या नायजेरीयन नागरिकाचे नाव असून एनसीबीने त्याच्याजवळ असलेले सुमारे 20 लाख रुपये किंमतीचे 200 ग्रॅम वजनाच मेफेड्रोन हे अंमली पदार्थ जप्त केले आहे. केनिथ इझी हा अंमली पदार्थांचा मुख्य पुरवठादार असून त्याला यापूर्वी देखील एनसीबीने अटक केली होती.

नायजेरीयन नागरिकाचा जंगलात दोन किमीपर्यंत पाठलाग

खारघर सेक्टर-32 भागात एक नायजेरीअन व्यक्ती अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती एनसीबीला मिळाली होती. त्यानुसार, रविवारी सायंकाळी मुंबई एनसीबीच्या पथकाने खारघर येथे त्याच्यावर पाळत ठेवली होती. यावेळी केनिथ इझी याला एनसीबीचं पथक आपल्या मागावर असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्याने त्याच भागातील जंगलात पलायन केले. यावेळी एनसीबीच्या पथकाने नायजेरीयन नागरिक केनिथ इझी याचा सदर जंगलामध्ये 2 किलोमीटरपर्यंत पाठलाग करुन त्याला पकडले.

त्यानंतर एनसीबीच्या पथकाने त्याची झडती घेतली असता, त्याच्याजवळ 200 ग्रॅम वजनाचे मेफेड्रॉन हे अंमली पदार्थ आढळून आले. आंतरराष्ट्रीय बाजारात 200 ग्रॅम वजनाच्या मेफेड्रॉनचा दर सुमारे 20 लाख रुपये असल्याची माहिती मुंबई एनसीबीच्या वेस्ट झोनचे डायरेक्टर समीर वानखेडे यांनी दिली.

या कारवाईत पकडण्यात आलेला केनिथ इझी हा अंमली पदार्थाचा मुख्य पुरवठादार असून तो मुंबई तसेच नवी मुंबईत अंमली पदार्थाचा पुरवठा करत असल्याचे वानखेडे यांनी सांगितले. तसेच, त्याला यापूर्वी देखील अंमली पदार्थाच्या तस्करी प्रकरणात अटक करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. केनिथ इझी याला मुंबईच्या नार्कोटिक्स ब्युरोने एनडीपीएस कलमाखाली अटक केली आहे. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.