बदल्यांचा सपाटा, आधी 4 IPS, आता 5 IAS अधिकाऱ्यांची बदली, मंत्रालयापासून विदर्भापर्यंत मोठे बदल

0 झुंजार झेप न्युज

राज्याच्या राजकारणात बदल्यांवरुन रणकंदन उठलं असताना, IAS आणि IPS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचं सत्र सुरुच असल्याचं दिसतंय.

IAS Transfers मुंबई : राज्याच्या राजकारणात बदल्यांवरुन रणकंदन उठलं असताना, IAS आणि IPS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचं सत्र सुरुच असल्याचं दिसतंय. कारण काही दिवसापूर्वीच 4 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यानंतर, आता 5 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. मंत्रालयापासून ते विदर्भापर्यंत मोठे फेरबदल करण्यात आले आहेत.

1. श्री. लोकेश चंद्र (IAS Lokesh Chand), आयएएस (१९९३) यांना प्रधान सचिव, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्त केले गेले आहे.

२. श्री. राजीव कुमार मित्तल (IAS Rajeev Kumar Mittal), आयएएस (१९९८)) सचिव , वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई यांना आयुक्त, विक्रीकर, महाराष्ट्र राज्य, मुंबई म्हणून नियुक्त केले गेले आहे.

३) श्री अमोल येडगे (IAS Amol Yedge), आयएएस (एमएच: २०१)), मुख्य कार्यकारी अधिकारी, झेडपी, अमरावती यांना जिल्हाधिकारी, यवतमाळ म्हणून नियुक्त केले गेले आहे.

४) श्री.अविशांत पांडा (IAS Avishant Panda), आयएएस (एमएच: २०१)) सहाय्यक जिल्हाधिकारी आणि प्रकल्प अधिकारी, आयटीडीपी, तळोदा, नंदुरबार यांना सीईओ, जि.प., अमरावती म्हणून नियुक्त केले गेले आहे.

५) श्रीमती. वासुमाना पंत (IAS Vasumana Pant), आयएएस (एमएच: 2017) सहाय्यक जिल्हाधिकारी आणि प्रकल्प अधिकारी, आयटीडीपी, नंदुरबार यांना सीईओ, झेडपी, वाशिम म्हणून नियुक्त केले गेले आहे.

यापूर्वी IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या

यापूर्वी 17 मार्चला मुंबई आणि महाराष्ट्र पोलीस दलात मोठ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या होत्या. राज्यात पोलीस विभागात मोठे फेरबदल करण्यात आले होते. राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे (Hemant Nagrale) हे नवे मुंबई पोलीस आयुक्त झालेत. तर रजनीश शेठ (rajnish seth)यांच्याकडे पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता. तसेच संजय पांडे यांच्याकडे (Sanjay Pande) महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जबाबदारी देण्यात आलीय. परमवीर सिंह (Paramveer singh)यांच्याकडे गृहरक्षक दलाची जबाबदारी सोपवण्यात आलीय.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.