एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी कोरोनाची लस घेतली आहे.
हैदराबाद : एमआयएमचे अध्यक्ष, लोकसभा खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी कोरोनाची लस घेतली आहे. कोरोना लसीचा पहिला डोस घेतल्याचं असदुद्दीन ओवेसी यांनी इन्स्टाग्राम पोस्टमधून सांगितलं आहे.
ओवैसी यांनी इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलंय, “मी आज कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. कोरोना लस फक्त तुम्हालाच सुरक्षित ठेवते असं नाही तर आपल्या जवळच्या व्यक्तींचा धोका देखील कमी करते किंबहुना त्यांनाही सुरक्षित ठेवते. मी विनंती करतो की जे पात्र असतील तर त्यांनीही कोरोना लस घ्यावी, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.”
ओवेसी यांनी इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत. त्यामध्ये हॉस्पिटलमधील नर्स ओवेसी यांना कोरोना लस देताना दिसून येत आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे लस घेतावेळी ओवेसी यांच्या चेहऱ्यावर मास्क नाहीय.

