कामगारांच्या न्यायहक्कासाठी मनसे खंबीर.
पुणे जिल्हा, खेड तालुक्यातील श्री क्षेत्र आळंदीच्या बाजूलाच असणाऱ्या मरकळ उद्योग नगरी मधील पॉलीयोनिक पेट्रोकेमिकल प्रायव्हेट लि. कंपनीच्या मालकांनी कंपनी तोट्यात दाखवून दिवाळखोरीत काढली त्यामुळे असंख्य स्थानिक मराठी तरुण जे पंधरा, पंधरा वर्षे काम करत होते त्यांचा रोजगार बंद झाला व स्थानिक मराठी तरुण देशोधडीला लागले त्यांच्यावर उपासमारीची वेळ ओढवली गेली. सदर कंपनीतील बाराशे कामगार बेरोजगार झाले त्यांची कोणत्याही प्रकारची देणी कंपनीने आजपर्यंत दिलेली नाही. अशातच कामगारांना विश्वासात न घेता व कोणत्याही प्रकारची देणी नं देता कंपनीचा एक युनिट लिक्विडेटर मार्फत विकले गेले त्या युनिटचा ताबा मिळवण्यासाठी नवीन मालकांनी कामगारांविरोधात संरक्षण मिळण्यासाठी आळंदी पोलीस ठाण्यात अर्ज केला. अशावेळी स्थानिक मराठी कामगारांच्या पाठीशी मनसे खंबीरपणे उभे राहून कामगारांना साथ दिली तसेच अशा सर्व स्थानिक भूमिपुत्राना त्यांचा न्यायहक्क मिळवून देण्यासाठी न्यायालयीन लढाई लढण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस *ॲड. किशोर शिंदे साहेब* यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील दिशा ठरवून स्थानिक भूमिपुत्राना त्यांचे हक्क मिळवून देऊ व त्यासाठी योग्य तो लढा दिला जाईल.
आपला
*ॲड. संतोष शिंदे*
उपाध्यक्ष
जनहित कक्ष व विधी विभाग
महाराष्ट्र नवनिर्माण सेना.मा.भरतशेठ पवळे अध्यक्ष शिवशंभू छावा प्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य ,मा.श्री मनोहर गोरगल्ले सचिव शिवशंभू छावा प्रतिष्ठाण महाराष्ट्र प्रदेश व कामगार श्री प्रशांत लोखडे, श्री शंकर लोखंडे,श्री प्रशांत वर्पे,श्री विश्वास लोखंडे व इतर मान्यवर उपस्थित होते .

