पैठण मध्ये तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी केली शहरातील वाढती कोरोना रुग्ण संख्येमुळे घरोघरी जनजागृती.
पैठण:(पैठण तालुका प्रतिनिधी किशोर धायकर) कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव शहरातील धार्मिक कार्यक्रम रद्द करावी लागलेली नाथ षष्ठीआणि कोरोना पार्श्वभूमीवर प्रशासनाने खबरदारीच्या विविध उपाय योजना देखील सुरू केल्या आहेत. शहरात तहसीलदार चंद्रकांत शेळके व मुख्याधिकारी सोमनाथ पाटील जाधव यांच्या नियंत्रणाखाली प्रशासनाने घरोघरी जाऊन सर्वेक्षण मोहीम हाती घेतली आहे.घरात कोणी आजारी आहे का, ४५ वर्षां वरील घरातील नागरिकांचे लसीकरण झाले आहे की नाही आदी बाबतच्या नोंदी घेऊन संपूर्ण कुटुंबियांची माहिती या मोहिमेत संकलित केली जात असून यासाठी शैक्षणिक संस्था- शाळा- विद्यालया मधील शिक्षकांसह विविध विभागांतील शासकीय कर्मचाऱ्यांच्या नेमणूक करण्यात आल्या असल्याची माहिती संबंधित सुत्रांनी माध्यमांना दिली.नागरिकांनी आवश्यक माहिती देऊन सहकार्य करावे असे आवाहनही करण्यात आले आहे प्रशासनाने केले आहे.

