होळी, धुलीवंदन, रंगपंचमी साजरी करण्यास मनाई, पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

0 झुंजार झेप न्युज

कोरोनाचा संसर्ग आणि प्रादुर्भाव पसरण्याची भीती लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे आणि त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे.

पुणेः गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यातच आता दिवसागणिक रुग्णांची संख्याही मोठी आहे. कोरोनाचा संसर्ग आणि प्रादुर्भाव पसरण्याची भीती लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे आणि त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्या पार्श्वभूमीवर पुण्यात होळी सणावर बंदी घालण्यात आलीय.

होळी, धुलीवंदन, रंगपंचमी हे सण/उत्सव साजरे करण्यास मनाई

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने पुणे जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रामध्ये साजरे होणारे होळी आणि धुलीवंदन सण/उत्सव एकत्रित येऊन सार्वजनिक ठिकाणी साजरे करण्यास मनाई आहे. तसेच हॉटेल्स, रिसॉर्ट, सार्वजनिक सभागृहे, सार्वजनिक आणि खासगी मोकळ्या जागा, सर्व गृहनिर्माण संस्थांमधील मोकळ्या जागा येथे होळी, धुलीवंदन, रंगपंचमी साजरे करण्यास बंदी घालण्यात आलीय.

धुलीवंदन आणि रंगपंचमी सण/उत्सव साजरे करण्यास मनाई

कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने खबरदारीचा उपाय म्हणून गर्दी टाळण्यासाठी पुणे जिल्ह्याचे ग्रामीण कार्यक्षेत्रातील सार्वजनिक ठिकाणी होळी खेळण्यास मज्जाव करण्यात आलाय. तसेच हॉटेल्स, रिसॉर्ट, सार्वजनिक सभागृहे, सार्वजनिक आणि खासगी मोकळ्या जागा, सर्व गृहनिर्माण संस्थांमधील मोकळ्या जागा येथे 28 मार्च 2021 ला साजरी होणारी होळी आणि 29 मार्चला साजरा होणारा धुलीवंदन आणि रंगपंचमी सण/उत्सव साजरे करण्यास मनाई केलीय. सदर मनाई आदेशांचं पालन करून नागरिकांनी जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असंही जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख म्हणालेत. तसेच जे कोणी आदेशाचा भंग करतील त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या तरतुदीनुसार कारवाई करण्यात येणार आहे.

मुंबई महापालिकेकडून परिपत्रक जारी

मुंबईत कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होऊ लागला आहे. त्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून होळी आणि धूलिवंदन/ रंगपंचमी हा उत्सव खासगी किंवा सार्वजनिक जागेत साजरा करण्यात मनाई करण्यात येत आहे. तसेच मी जबाबदार या मोहिमेंतर्गत वैयक्तिरित्याही हा सण साजरा करणे टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

तसेच जो कोणी या नियमांचे पालन करणार नाही, त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुंबई महापालिकेने दिला आहे. मुंबई महापालिकेकडून याबाबतचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. त्यामुळे यंदा खाजगी किंवा सार्वजनिक ठिकाणी होळी साजरी करण्यावर निर्बंध लागू करण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील कोरोना स्थिती

राज्यात बुधवारी दिवसभरात 28 हजार 699 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर 13 हजार 165 जण कोरोनामुक्त झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या काही दिवसांपेक्षा आज मृतांच्या संख्येत मोठी वाढ झालेली पाहायला मिळत आहे. बुधवारी दिवसभरात 132 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या 2 लाख 30 हजार 641 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

दरम्यान, राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 25 लाख 33 हजार 26 वर जाऊन पोहोचली आहे. त्यातील 22 लाख 47 हजार 495 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे एकूण 53 हजार 589 जणांचा मृत्यू झाला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.