चालत्या रेल्वेत चढत होता माणूस, पुढे जे झालं ते अतिशय हादरवणारं,

0 झुंजार झेप न्युज

छत्तीसगड राज्यातील रायपूर रेल्वेस्थानकावर एक घटना घडली आहे. या घटनेत रेल्वे प्रवाशाचा प्राण वाचला आहे. 

रायपूर : रेल्वे प्रवास सोपा आणि सुरक्षित असल्यामुळे आपल्या देशात रेल्वेस्थानकांवर मोठ्या प्रमाणात गर्दी असते. धावत्या रेल्वेमध्ये चढण्याची कसरत करुन आपल्या इप्सीत ठिकाणी पोहोचण्यासाठी धडपड करणारे अनेक प्रवासी आपण पोहतो. या धडपडीमध्ये अनेक अपघात झाल्याचे तुम्ही पाहिले असेल. घाई-घाईने रेल्वेमध्ये चढण्याचा प्रयत्न करणाऱ्या कित्येक प्रवाशांचा मृत्यू झाल्याच्याही घटना घडल्या आहेत. यामध्ये दैव बलवत्तर म्हणून कित्येक जण रेल्वेच्या अपघातातून सुखरुप वाचलेलेही आहेत. अशीच एक घटना छत्तीसगड राज्यातील रायपूर रेल्वेस्थानकावर घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतो आहे.

नेमकी घटना काय ?

मिळालेल्या माहितीनुसार छत्तीसगड येथील रायपूर रेल्वेस्थानकात एक रेल्वे वेगात निघाली होती. यावेळी एक माणूस रेल्वेच्या मागे अचानकपणे पळू लागला. त्याच्याकडे दोन्ही हातांमध्ये सामान होते. त्याने लगेच धावत्या रेल्वेमध्ये चढण्याचा प्रयत्न केला. मात्र, हातात सामान असल्यामुळे त्याला वेगात धावणाऱ्या रेल्वेमध्ये चढता आले नाही. त्याचा पाय निसटला आणि तो रेल्वे फलाटावर पडला. तो फक्त पडलाच नाही, तर रेल्वेसोबत तोही फरफटतही जाऊ लागला. हा सारा प्रकार रेल्वे पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने पाहिला. या पोलिसाने तत्काळ धाव घेत फरफटत जाणाऱ्या माणसाला पकडलं. त्याला रेल्वेच्या खाली जाण्यापासून वाचवलं. यावेळी रेल्वे पोलिसाचा एक कर्मचारी धावत गेला नसता तर कदाचित त्या माणसाचा रेल्वेखाली येऊन मृत्यूदेखील झाला असता. जीवाची बाजी लावत रेल्वेखाली जाणाऱ्या माणसाला वाचवणाऱ्या रेल्वे पोलिसाच्या जवानाचं नाव शिवम सिंह असं आहे.

 


व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

दरम्यान, हा प्रकार घडल्यानंतर जवान शिवम सिंह यांचे अनेकांनी कौतुक केले आहे. त्यांनी प्रयत्न केल्यामुळेच या माणसाचे प्राण वाचू शकल्याची भावना लोकांमध्ये आहे. ही घटना घडताच, त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनेकांनी या व्हिडीओला शेअर केलं असून रेल्वे प्रवास करताना घाई करणे चुकीचे असल्याचेही अनेकांकडून सांगितले जात आहे. तसेच रेल्वेखाली जाणाऱ्या माणसाला वाचवण्यात यश आल्यामुळे या माणसाचे नशिब बलवत्तर असल्याच्याही अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.