बहुजन समाज पार्टी पिंपरी चिंचवड शहर संघटन बांधणी बैठक
पिंपरी चिंचवड:आज दिनांक 28 मार्च २०२१ रोजी पिंपरी येथे बहुजन समाज पार्टी पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष मा. सूरज गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली व प्रदेश सदस्य राहुलजी ओव्हाळ व पिंपरी चिंचवड शहर प्रभारी सुरेश दादा गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडली यावेळी धनगर समाजातील तसेच माळी ओबीसी समाजातील असंख्य कार्यकर्त्यांनी बहुजन समाज पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी धनगर समाजाचे नेते माननीय राहुलजी मदने, माळी समाजाचे नेते सुधाकरजी फुले, तसेच गांधी नगर पिंपरी भागांमधून विनोद जाधव यांनी संत तुकाराम नगर परिसरातून सखाराम पगारे तसेच भोसरी परिसरांमधून सुधीर पाडगण, भानुदास दाभाडे, यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी आज बहुजन समाज पार्टीमध्ये प्रवेश केला.. यावेळी ज्येष्ठ बसपा नेते प्रा. बी. बी. शिंदे, मा विजय कुमार मिसले (पुणे जिल्हा सचिव) मधुकर इंगळे (पुणे जिल्हा सचिव) हरीश डोळस (पुणे जिल्हा सचिव) सुनील कुमार कुट्टी (पुणे जिल्हा संघटन मंत्री) गौतम जी गायकवाड (पिंपरी-चिंचवड उपाध्यक्ष) राजेंद्र जी पवार (पिंपरी-चिंचवड सचिव) परमेश्वर निसर्गंध (पिंपरी चिंचवड कार्यालय सचिव) विद्या ताई जाधव (महिला शहराध्यक्ष) चंद्रकांत सोनवणे (पिंपरी विधानसभा अध्यक्ष) आदी बहुजन समाज पार्टीचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.... यावेळी गांधीनगर परिसरातील विनोद जाधव यांची प्रभाग क्रमांक 9 च्या बसपा अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली तसेच सखाराम पगारे यांची बसपा पिंपरी विधानसभा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.धनगर समाजाचे नेते माननीय राहुल जी मदने साहेब यांची बसपा पिंपरी-चिंचवड शहर कोषाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली... तसेच माळी समाजाचे नेते मा. सुधाकर फुले यांची बसपा पिंपरी-चिंचवड शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली तसेच सुधीर पडघान यांची दिघी रोड सेक्टर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली... सदरील मिटींगचे आभार प्रदर्शन चंद्रकांत सोनवणे (पिंपरी विधानसभा अध्यक्ष) यांनी केले व सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या..... सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना मनःपूर्वक अभिनंदन व भावी कार्यास हार्दिक शुभेच्छा...

