सौर ऊर्जा प्रकल्पवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी
पिंपरी चिंचवड महानगरपालिका सर्व प्रभाग कार्यालय ,अंकुशराव लांडगे नाट्यगृह, हेडगेवार भवन ,या ठिकाणी सौर ऊर्जा पी व्ही सिस्टीम बसविण्यात आलेली आहे. सौर ऊर्जा चे काम ऑपरेशन अँड मेंटनस हे काम कॉन्ट्रॅक्टर मार्फत पाच वर्षाकरिता देण्यात आलेले आहे. परंतु या कामावर पालिकेचे अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर यांचे सगनमताने सौर ऊर्जा पीव्ही पॅनल सिस्टम ची स्वच्छता केली जात नाही .त्यामुळे यावर जनरेशन वर परिणाम होऊन कमी वीज निर्मिती होते. अशा निष्क्रिय अधिकार्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे करोडो रुपयांचे नुकसान होत आहे. तरी अशा बेजबाबदार अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा युवा कामगार सेनेचे शहराध्यक्ष कमलेश पोरवाल यांनी दिला आहे

