खासगी रुग्णालयांनी कोरोना त्वरित बेड द्यावेत, अन्यथा…. पुण्याच्या महापौरांचा निर्वाणीचा इशारा

0 झुंजार झेप न्युज

 खासगी रुग्णालयांनी त्यांच्या ताब्यातील बेडस्‌ स्वत:हून त्वरित करोना (Pune Corona Update) रुग्णांसाठी महापालिकेकडे द्यावेत, अन्यथा कारवाई करायला कोणीही भाग पाडू नये, पुणे महापैरांचा इशारा.

पुणे : खासगी रुग्णालयांनी त्यांच्या ताब्यातील बेडस्‌ स्वत:हून त्वरित करोना (Pune Corona Update) रुग्णांसाठी महापालिकेकडे द्यावेत, अन्यथा कारवाई करायला कोणीही भाग पाडू नये, असा इशारा पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांचा खासगी रुग्णालयांना दिला आहे 

कोरोना बाधितांना बेड मिळत नसल्याच्या तक्रारी आता हेल्पलाईनवर सुरू झाल्या आहेत. वाढती रुग्णसंख्या आणि बेडचे नियोजन ही महापालिकेच्या दृष्टीने आता जिकिरीची गोष्ट झाली आहे. शहरातील रोजची तीन हजारांची वाढ पाहता यापैकी दोनशे ते तीनशे जणांना रूग्णालयांत दाखल करावे लागत आहे. त्यातील काही जणांना ऑक्‍सिजन बेडची आवश्‍यकता भासते. त्यामुळे खासगी रुग्णालयांनी त्यांच्या ताब्यातील बेडस्‌ स्वत:हून त्वरित करोना रुग्णांसाठी महापालिकेकडे द्यावेत, अन्यथा कारवाई करायला कोणीही भाग पाडू नये, असा इशारा त्यांनी दिला.

पुण्यात कोरोना आढावा बैठक, लॉकडाऊनचा निर्णय होण्याची शक्यता

पुणे जिल्ह्याच्या लॉकडाऊनचा आज निर्णय होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत पुण्यात आज कोरोना आढावा बैठक सुरु आहे. या बैठकीत हा निर्णय होण्याची शक्यता आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील कोरोनासंदर्भात अजित पवार आढावा घेणार आहेत. कोरोना रुग्णसंख्या पाहता लॉकडाऊन होणार की कडक निर्बंध यावर आज निर्णय होणार आहे.

पुण्याचे महापौर लॉकडाऊनच्या विरोधात तर प्रशासन लॉकडाऊन लावण्याच्या मनस्थितीत असल्याची माहिती आहे.

वाढती कोरोना संख्या, पुणेकरांची चिंता वाढली

कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक उपाययोजना आणि स्थानिक पातळीवर काही निर्बंध लावण्यात आले आहेत. तरीही कोरोनाचा विळखा वाढताना पाहायला मिळत आहे. त्यात पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. पुणे शहरातील कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्यूच्या प्रमाणातही मोठी वाढ होत आहे. त्यामुळे प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. अशा स्थितीत पुणे शहर आणि जिल्ह्याची लॉकडाऊनच्या दिशेनं वाटचाल सुरु असल्याचंच पाहायला मिळत आहे.

मागील 4 दिवसातील रुग्णवाढ –

21 मार्च – 2 हजार 900 नवे रुग्ण, 28 रुग्णांचा मृत्यू, 8 रूग्ण पुण्याबाहेरील.

22 मार्च – 2 हजार 342 नवे रुग्ण, 17 रुग्णांचा मृत्यू, 2 रूग्ण पुण्याबाहेरील.

23 मार्च – 3 हजार 98 नवे रुग्ण, 31 रुग्णांचा मृत्यू, 9 रूग्ण पुण्याबाहेरील.

24 मार्च – 3 हजार 509 नवे रुग्ण, 33 रुग्णांचा मृत्यू, 9 रुग्ण पुण्याबाहेरील.

लॉकडाऊनच्या दिशेने वाटचाल

पुण्यात गेल्या काही दिवसांतील कोरोना रुग्णांची आकडेवारी पाहिली तर ती अतिशय चिंताजनक आहे. त्यामुळे पुण्याची वाटचाल लॉकडाऊनच्या दिशेनं होत असल्याचं बोललं जात आहे. पण महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुण्याची स्थिती काहीशी चिंताजनक बनली असली तर लॉकडाऊन करण्यासारखी परिस्थिती नसल्याचा दावा केला आहे. पण प्रशासन मात्र लॉकडाऊनच्या मनस्थितीत असल्याचं पाहायला मिळतंय.

पुणे शहरात ऑक्सिजन बेडचा तुटवडा निर्माण झाला आहे. रोजचे बाधित आणि गंभीर रुग्णांची आकडेवारी लक्षात घेतली तर फक्त 378 बेडच शिल्लक आहेत. म्हणजे एकूण बेड्सपैकी फक्त 10 टक्के बेड शिल्लक आहे, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.

रुग्णालयातील बेड्सची आकडेवारी

> सर्वसाधारण बेड – एकूण 906, शिल्लक 249

>> ऑस्किजन बेड – एकूण 3344, शिल्लक 378

>> अतिदक्षता बेड – एकूण 322, शिल्लक 27

>> व्हेंटिलेटर बेड – एकूण 445, शिल्लक 30

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.