अहमदनगरमध्ये आमदार लंकेंच्या प्रयत्नांना जनतेचीही साथ, मदतीचा ओघ सुरुच, 17 लाख रोख रक्कम, 5 टन धान्य जमा

0 झुंजार झेप न्युज

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाने कोविड सेंटर सुरू केलंय.

अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी अहमदनगरमध्ये दुसऱ्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाने कोविड सेंटर सुरू केलंय. पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे तब्बल 1 हजार 100 खाटांचं हे कोविड सेंटर सुरु झालं आहे. येथे 100 ऑक्सिजन बेड्स आहेत. विशेष म्हणजे या कोरोना उपचार केंद्रासाठी मोठ्या प्रमाणात मदतीचा ओघ सुरू आहे. लंके यांनी आवाहन केल्यानंतर 17 लाख रोख रक्कम आणि 5 टन धान्य जमा झाले आहे. भाजीपाला, फळे, अंडी, किराणा, वाफ घेण्याची यंत्रे, कोमट पाण्यासाठी थर्मास अशा विविध वस्तूंचं वाटप रुग्णांना करण्यात येतंय. त्यामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. निलेश लंके यांनी सर्वांना काळजी घेण्याचं आवाहन केलंय.

“शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिराष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी अहमदनगरमध्ये दुसऱ्यांदा ” असं या कोविड सेंटरचं नाव आहे. प्रांताधिकारी सुधाकर भोसले, तहसीलदार ज्योती देवरे यांच्यासह विविध पक्षातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत शासनाच्या अटी व नियमांचे पालन करत हा लोकार्पण सोहळा संपन्न झाल्याची माहिती लंके यांनी दिलीय. निलेश लंके म्हणाले, “माझ्या मतदार संघातील भाळवणी येथे 1100 बेडच्या सेंटरची उभारणी करण्यात आली. त्यातील 100 बेड ऑक्सिजनचे असतील. प्रत्येक रुग्णांसाठी स्वतंत्र थर्मास, मास्क, स्टीमर, पाणी बॉटल, नॅपकिन, साबण आदी मूलभूत सुविधा दिल्या जाणार आहेत. 24 तास पिण्यासाठी व अंघोळीसाठी गरम पाणी, सकस जेवण, दूध, अंडी, सूप आदींचा समावेश असेल. दररोज मोठ्या स्क्रीनवर योगाचे प्रात्यक्षिक दाखवण्यात येणार आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार योग्य ते काढे दिले जाणार आहेत.”

आमदार लंकेंडकडून स्वतः कोव्हिड सेंटरचा आढावा

आमदार लंके या ठिकाणी स्वतः लक्ष देऊन व्यवस्था पाहत आहेत. तेथील सर्व रुग्णांना व्यवस्थित औषध उपचार, जेवणाची सोय आणि कोणत्या रुग्णाला काही समस्या आहे का या बाबत त्यांनी दिवसभर कोव्हिड सेंटरला बसून संपूर्ण आढावा घेतला. यावेळी त्यांनी कोव्हिड सेंटरमधील सर्व रुग्ण बांधवांना आधार देत घाबरून न जाता कोणतीही अडचण आली तर त्याबाबत माहिती देण्याचं आवाहन केलंय. तसेच रुग्णांना जी काही मदत लागेल ती 100 टक्के मिळवून देण्यासाठी सदैव तत्पर राहील, असंही आश्वासन लंके यांनी दिलंय.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.