दिल्लीत सर गंगाराम रुग्णालयात ऑक्सिजनच्या अभावी 25 कोरोना रुग्णांचा मृत्यू

0 झुंजार झेप न्युज

दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात गंभीर स्थितीत असलेल्या 25 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच इतर 60 रुग्णांचा जीव धोक्यात आहे. ऑक्सिजनच्या पुरवठ्याअभावी या रुग्णांचा जीव गेल्याचं सांगण्यात येतंय.

नवी दिल्ली : देशातील कोरोना संक्रमणाची परिस्थिती अत्यंत भयानक होत आहे. ऑक्सिजनच्या अभावी अनेक रुग्णांचा जीव धोक्यात आल्याचं दिसून येतंय. त्यातच आता दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात गंभीर स्थितीत असलेल्या 25 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ऑक्सिजनच्या अभावी या रुग्णांना आपला जीव गमवावा लागल्याचं सांगण्यात येतंय. अजूनही या रुग्णालयात 60 रुग्णांचा जीव धोक्यात असल्याचं सांगण्यात येतंय. 

सर गंगाराम रुग्णालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की, ऑक्सिजनचा पुरवठा अजून केवळ दोनच तास चालेल. व्हेन्टिलेटर आणि बीआयपीएपी मशिन प्रभावीपणे काम करत नाहीत. त्यामुळे गंभीर स्थितीत असलेल्या 60 रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे. 

25 sickest patients have died in last 24 hrs at the hospital. Oxygen will last another 2 hrs. Ventilators & Bipap not working effectively. Need Oxygen to be airlifted urgently. Lives of another 60 sickest patients in peril: Director-Medical, Sir Ganga Ram Hospital, Delhi

— ANI (@ANI) April 23, 2021

दिल्लीत दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे. त्यामुळे दिल्लीतील आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला असून दिल्लीमध्ये बेड्स आणि ऑक्सिजनचा तुटवडा पडत असल्याचं दिसून येत आहे. गुरुवारी दिल्लीतील GTB रुग्णालयात एक आणिबाणीचा प्रसंग निर्माण होऊन ऑक्सिजनच्या पुरवठ्यात तुटवडा निर्माण झाला आणि त्यामुळे 500 रुग्णांचा जीव धोक्यात आला होता. पण या ठिकाणी वेळेत ऑक्सिजनचा टॅन्कर पोहोचला आणि या सर्व रुग्णाचा जीव वाचला. ही घटना ताजी असतानाच आज सर गंगाराम रुग्णालयात दुर्दैवी घटना घडली आहे.

दिल्लीत गेल्या 24 तासात दिल्लीमध्ये 26,169 कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली आहे तर 306 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या दहा दिवसात दिल्लीत 1750 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.