काळजाला चटका लावणारी घटना, काल जन्मलेल्या जुळ्या मुलींच्या आईचा आज कोरोनामुळे मृत्यू

0 झुंजार झेप न्युज

 काळजाला चटका लावणारी घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे. कोरोनाव्हायरसने 24 तासातंच जुळ्या चिमुकल्यांच्या डोक्यावरील मायेचं छत्र हिरावून घेतलं. कोरोनाबाधित आईचा आज मृत्यू झाला.

पिंपरी चिंचवड : जुळ्या बाळांना जन्म दिलेल्या कोरोनाबाधित आईचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात घडली आहे. सुदैवाने जुळ्या मुलींची अँटीजेन टेस्ट निगेटिव्ह आलेली आहे. 

35 वर्षीय या महिलेच्या प्रसुतीची वेळ जवळ आली होती, त्यातच तिला 4 एप्रिलला त्रास होऊ लागला. तिला वायसीएम रुग्णालयात दाखल करताना ऑक्सिजन लेव्हल खालावली होती. त्यामुळे अँटीजेन चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली. दुसऱ्या दिवशी म्हणजे 5 एप्रिलला ऑपरेशन (सिझेरियन) करुन प्रसुती करण्यात आली आणि तिने जुळ्या गोंडस मुलींना जन्म दिला. पण त्यानंतर आईची प्रकृती खालावत गेली आणि आज सकाळी तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. 

24 तासाच्या आतच जुळ्या चिमुकल्यांच्या डोक्यावरील मायेचं छत्र हरपलं. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.