कोरोनाचा कहर, पालघर जिल्ह्यात 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध, ‘हे’ 9 नियम बंधनकारक

0 झुंजार झेप न्युज

कोरोनाचा कहर, पालघर जिल्ह्यात 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध, ‘हे’ 9 नियम बंधनकारक.

पालघर : राज्यभरात कोरोना संसर्गाने कहर केलाय. त्यामुळेच महाराष्ट्रात विकेंड लॉकडाऊन घोषित करण्यात आलाय. मात्र, पालघरमध्ये वाढत्या कोव्हिड-19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात 30 एप्रिलपर्यंत कठोर निर्बंध लावले आहेत. त्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन व्यवहारांवर काही प्रमाणात निर्बंध येणार आहेत. महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांकडील 4 एप्रिल 2021 रोजीच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे पालघरमध्ये 5 एप्रिल ते 30 एप्रिल या काळात कडक निर्बंध लावण्यात आलेत.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कशी होणार?

1. ऑटोरिक्षा : चालक + 2 प्रवासी क्षमतेने प्रवास करता येईल.

2. टॅक्सी : वाहन क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने प्रवास करता येईल.

3. बस : पूर्ण आसन क्षमतेने प्रवास करता येईल. पंरतु उभे राहून प्रवास करता येणार नाही.

4. वाहनातील सर्व प्रवासांनी मास्क घालणे बंधनकारक आहे.

5. एकाही प्रवासाने मास्क न घातल्यास चालकास दंड आकारण्यात येईल.

6. प्रत्येक खेपेनंतर वाहन निर्जंतुकीकरण (sanitized) करणे बंधनकारक आहे.

7. जिल्हयातील सीमा तपासणी नाका येथून जिल्हयात येणाऱ्या प्रत्येक वाहनाचे चालक, वाहक व इतर कर्मचारी यांची 10 एप्रिल 2021 पासून RTPCR चाचणी निगेटीव्ह अहवाल सोबत असणे बंधनकारक असेल अन्यथा 1000 रुपये दंड आकारण्यात येईल.

8. ऑटोरिक्षा व टॅक्सीचे वाहन चालकाने प्लॅस्टीक आवरण घातले असल्यास RTPCR चाचणी निगेटीव्ह अहवाल सोबत असणे पासून अपवाद करता येईल.

9. खासगी वाहतूक सोमवार ते शुक्रवार या वारी सकाळी 7 वाजल्यापासून सायंकाळी 8 वाजेपर्यंत सुरु राहील. त्यानंतर फक्त अत्यावश्यक सेवेसाठी सुरु राहील.

पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी याबाबत स्पष्ट आदेश दिले आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.