बहुजन समाज पार्टी पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने शासकीय नियमानुसार पार्श्वभूमीवर उपस्थित महात्मा फुले यांच्या पुतळ्याला हार घालून अभिवादन करण्यात आले.
पिंपरी चिंचवड:आज क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त महात्मा फुले पुतळा येथे बहुजन समाज पार्टी पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने शासकीय नियमानुसार कोरोनाच्या पाश्वभूमीवर मोजक्याच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत महात्मा फुले यांच्या पुतळ्याला हार घालून अभिवादन करण्यात आले... यावेळी बहुजन समाज पार्टी प्रदेश सदस्य राहुल ओव्हाळ, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सूरज गायकवाड, पिंपरी चिंचवड शहर प्रभारी सुरेश गायकवाड पुणे जिल्हा सचिव मधुकर इंगळे, हरीश डोळस, पुणे जिल्हा संघटन मंत्री सुनीलकुमार कुट्टी, पिंपरी चिंचवड उपाध्यक्ष गौतम गायकवाड, पिंपरी विधानसभा अध्यक्ष चंद्रकांत सोनवणे आदी बसपा कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते...

