चैत्यभूमीकडे वाकड्या नजरेने बघाल तर डोळे काढू..!

0 झुंजार झेप न्युज

 चैत्यभूमीकडे वाकड्या नजरेने बघाल तर डोळे काढू..!

सदा सरवणकर वर 353 अंतर्गत गुन्हा दाखल करा!दगड मारण्याची धमकी देणारे, दगडाने पुसत पुसत आमदार झालेले तुम्हाला दोन पायावर नीट बसता तरी येत का? चैत्यभूमी जगाची "अस्मिताकेंद्र" त्याला ललकारतो? कुठचाच ठेवणार नाहीत भीमसैनिक.. हे लक्षात ठेव.दादर तुमच्या बापाची जहांगीर समजतो का? जगात दादर हे महामानवाच्या ऐतिहासिक क्रांतीमुळे ओळखलं जातं. शिवसेना भवनला शिवाजी महाराजांच्या डोक्यावर ठाकरेंचा फोटो लावणारे तुम्ही ना शिवाजी महाराजांचे झालात न महापुरुषांचे झालात.अडाणचोटा सारखा आधीच मजला बांधला आणि चैत्यभूमी झाकण्याचा समाजकंटकीय प्रयत्न केला. आता नियमाने हे अतिक्रमण पाडायला काढलं तर तिथे येऊन दगड मारण्याची धमकी देतो. कुणाचं काम अडवतोस काही भान आहे का? आधी घोडचूक केलीस, आता नौटंकी करतो.व्हिडीओ वायरल झालाय, माज संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलाय. जयंती तोंडावर आहे, समाजात तीव्र संताप आहे. वेळ आल्यावर याच्या कर्मठतेचा माज पँथर स्टाईल उतरवणारच. दगड फेकण्याची धमकी देणाऱ्या हा चिरकूट आमदारावर शासकीय कामात अडथळा आणला म्हणून तात्काळ 353 अंतर्गत गुन्हा दाखल करा. सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला म्हणून समाजकंटक दंगलखोर म्हणून कार्यवाही झालिच पाहिजे.एखादं जनहिताच सरकारी काम एखाद्या आंबेडकरी संघटनेच्या नेत्याने रोखलं असतं अशा व्हिडीओ वायरल झाला असता तर आता पर्यंत गुन्हाही दाखल झाला असता. या सरवणकर वर तात्काळ कार्यवाही झाली पाहिजे. चैत्यभूमी भागात या इसमास फिरण्यास बंदी घातली पाहिजे अन्यथा येणाऱ्या काळात ही व्यक्ती काहीही कुबांड करेल कारण याच्या डोळ्यात चैत्यभूमी सलत आलेली आहे. डोक्यात भयानक जातीयता भरलेली आहे. ऑल इंडिया पँथर सेनेची मागणी आहे की, आमची तर मागणी आहे की, या ठिकाणची सम्शानभूमी हटवावी आणि संपूर्ण जागा चैत्यभूमीला देण्यात यावि. सरकार आली म्हणून दंडेलशाही चालणार नाही, येते भीमशाही आहे नाद करायचा नाही. याद राखा, चैत्यभूमीकडे वाकड्या नजरेने बघाल तर डोळे काढू..!

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.