ससून रुग्णालयातील बेड वाढवा रिपब्लिकन पक्षाची मागणी...
पूणे शहरातील कोरोना संसर्ग झालेल्या रूग्णांचे बेड विना प्रचंड हाल होत आहेत.या विषयावर आज पूण्यनगरीचे उपमहापौर मा.सौ.सुनिताताई वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली रिपाई च्या शिष्टमंडळाने ससून चे अधिष्ठाता मा.मुरलीधर तांबे साहेब यांची भेट घेऊन चर्चा केली असता ससून मध्ये ५२५ बेड पूर्ण क्षमतेने भरले असून एकही जागा शिल्लक नाही ८०ते ९०रूग्ण बेड साठी प्रतिक्षेत आहेत असे सांगण्यात आले. ससून रुग्णालयात मृत्यूदर खूप वाढला आहे.रूग्णांकडे दुर्लक्ष केले जात आहे असा आरोप यावेळी करण्यात आला.ससून मध्ये मनुष्यबळ कमी पडत असल्याचा त्यांनी मान्य केले.लवकरात लवकर मनुष्यबळ न वाढविल्यास रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तिर्व आंदोलनांचा इशारा या वेळी देण्यात आला.यावेळी प.महाराष्ट्र युवक अध्यक्ष मा.परशुराम वाडेकर पुणे शहर युवक अध्यक्ष मा.शैलेंद्र चव्हाण उपस्थित होते.

