नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक रुग्णवाढ! गरोदर आणि कोरोनाबाधित आहात? ऑनलाईन ओपीडी सुरु

0 झुंजार झेप न्युज

गेल्या 24 तासांत नागपूर जिल्ह्यात 5 हजार 338 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर दिवसभरात 66 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

नागपूर : राज्यात करोनोचा प्रादुर्भात दिवसेंदिवस वाढतोय. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद अशा मोठ्या शहरांमधील कोरोना रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. नागपुरात तर आज आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णवाढ नोंदवली गेली आहे. गेल्या 24 तासांत नागपूर जिल्ह्यात 5 हजार 338 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर दिवसभरात 66 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अशावेळी गरोदर मातांना कोरोनाचा धोका वाढला आहे. त्यांच्यासाठी आता नागपुरात ओपीडी सुरु करण्यात आली आहे. 

ऑनलाईन ओपीडी सुरु

नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. अशावेळी खासगी आणि सरकारी रुग्णालयात बेड मिळत नाहीत. त्यामुळे कोरोनाबाधितांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. यावर उपाय म्हणून शहरातील काही डॉक्टरांनी कोरोना रुग्णांसाठी ऑनलाईन ओपीडी सुरु केलीय. शहरातील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सीमा दंदे यांनी कोरोनाबाधित गरोदर महिलांसाठी ऑनलाईन ओपीडी सुरु केली आहे.

एखादा व्यक्ती कोरोनाबाधीत झाल्यावर नेमकं काय करायचं असा प्रश्न त्याला पडतो. ज्यांना प्रत्यक्ष डॉक्टरांकडे जाणं शक्य नाही. त्या कोरोनाबाधित रुग्णांना ऑनलाईन ओपीडीचा चांगला फायदा होत आहे. सध्या कोरोनाच्या संकटात याबाबत जनजागृती करत असल्याचं सोशल मीडिया तज्ज्ञ अजित पारसे यांनी सांगितलं.

आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णवाढ

गेल्या 24 तासांत नागपूर जिल्ह्यात 5 हजार 338 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर दिवसभरात 66 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत 3 हजार 868 जण कोरोनामुक्त झाले आहेत. नव्या आकडेवारीसह नागपूर जिल्ह्यातील अॅक्टिव्ह रुग्णसंख्या आता 42 हजार 933 वर जाऊन पोहोचली आहे.

नागपूरमध्ये कोरोना चाचणी कशी होते?

एखाद्याला लक्षणे असली किंवा तो कोरोना रुग्णाच्या संपर्कात आला असेल आणि त्याला टेस्ट करायची असेल तर नागपुरात विविध ठिकाणी कोरोना चाचणी केली जाते.

नागपुरात टेस्ट करण्यासाठी प्रत्येक झोनमध्ये वेगवेगळी केंद्र उघडली आहेत. त्या ठिकाणी RTPCR आणि अँटिजन टेस्ट केली जाते. जवळपास 200 केंद्रांवर ही टेस्ट होते. सोबतच खाजगी रुग्णालय ज्यांना कोव्हिड रुग्णालय जाहीर केलं आहे, तिथे काही खाजगी लॅबमध्ये सुद्धा टेस्ट केली जाते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.