कोरोना झाल्यावर नेमकं काय करावं, कुठे संपर्क साधावा याबाबत अद्यापही अनेक नागरिकांमध्ये अज्ञान आहे.
जळगाव : राज्यात कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे मुंबई, पुणे, नागपूर आणि औरंगाबाद या प्रमुख शहरांममध्ये कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक असल्याने या शहरांमध्ये बेड्सची कमतरता भासत असल्याच्या तक्रारी येत आहेत. कोरोना झाल्यावर नेमकं काय करावं, कुठे संपर्क साधावा याबाबत अद्यापही अनेक नागरिकांमध्ये अज्ञान आहे. त्यामुळे अनेकांना त्यांचे जीवही गमवावे लागत आहेत.
राज्यात दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांमध्ये रेकॉर्ड ब्रेक वाढ होत आहे. तसेच, मृत्यू होणाऱ्यांचं प्रमाणही काही कमी नाही. याचं एक कारण म्हणजे सरकारच्या सुविधांची माहिती नसणे हेही आहे. आपल्या परिसरात, जिल्ह्यात आपल्या महानगरपालिकेने काय सुविधा केलीये याची संपूर्ण माहिती अद्यापही अनेकांना नाही. महापालिका प्रशासन नागरिकांपर्यंत हे सर्व पोहोचवण्याचा पूरेपूर प्रयत्न करत आहेत, तरीही अनेकांच्या मनात अद्यापही अनेक प्रश्न आहेत. त्याच सर्व प्रश्नांची उत्तर आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहेत.
जळगाव जिल्ह्यात कोरोनाने सर्वत्र थैमान घातले आहे. असून जिल्ह्यात दिवसेंदिवस मृत्युचे प्रमाण वाढले आहे.
जगावातत सध्या कोरोनाची स्थिती काय?
जिल्ह्यातील मृत्यूदर वाढण्यासाठी कुठेतरी प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप आहे. कारण, रेमडेसिव्हर इंजेक्शनचा तुटवडा जिल्ह्यात भासत असून रुग्णांना बेड मिळत नसल्याने अनेक रुग्णांचा मृत्यू होत आहे. जिल्ह्यात 1182 रुग्ण नव्याने आज आढळून आले आहेत. तर 15 रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. तर, आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 1697 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रोज कोरोना रुग्णाच्या मृत्यू चे प्रमाण वाढल्यामुळे जिल्हयात अनेक ठिकाणी शमशान भूमीत जागा नसल्याचे दिसून येत आहे.
टेस्ट कशी होते?
जळगाव शहरात एखाद्या रुग्णामध्ये कोरोनाची लक्षण जाणवली तर त्याला त्वरीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात किंवा जवळच्या कोव्हिड सेंटरमध्ये आणि खाजगी लॅबमध्ये कोरोना चाचणीसाठी पाठविण्यात येते.
कोणत्या प्रकारच्या टेस्ट होतात?
जळगावात आरटीपीसीआर आणि अटीजन टेस्ट केल्या जातात. तसेच रक्त चाचणी किंवा सिटी स्कॅन चा मार्फत देखील कोरोनाचे निदान केल जातं.
टेस्टसाठी रांगा, एका व्यक्तीला अर्धा ते एक तास
कोरोनाची लक्षणे किंवा रुग्णांच्या संपर्कात आलेले व्यक्ती हे कोविड सेंटर मध्ये किंवा खाजगी लॅब मध्ये जाऊन आपली कोरोना चाचणी लरू शकतात. रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यासाठी 10 मिनिटं तर अहवाल यायला अर्धा ते तासभर वेळ लागतो.
टेस्टचा रिपोर्ट येण्यासाठी किती वेळ लागतो? तोपर्यंत रुग्णाने काय करायचं?
आरटीपीसीआर चाचणी केल्यानंतर अहवाल यायला दोन दिवस वेळ लागतो. जास्त वेळ लागल्यास रुग्णांना गृह विलगिकरणात राहण्याचा सल्ला प्रशासनातर्फे दिला जातो. तसेच, याचं पालन केलं जात आहे की नाही याकडेही लक्ष दिलं जातं.
एखाद्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर काय प्रोसेस?
कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर सदर रुग्णांची परिस्थिती पाहून त्याला कोव्हिड सेंटरमध्ये किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांना गृहविलगीकरणात ठेवण्यात येते.
रेमडेसिव्हीर मिळतं का? त्यांचे दर, रुग्णालयांची फी वगैरे सगळं
जिल्ह्यात काही सामाजिक संस्थेमार्फत रेमडेसिव्हरचे इंजेक्शन हे 750 रुपयाला दिले जाते केमिस्ट बांधवांकडून 1200 रुपयाला ते मिळते.
जिल्ह्यात रेमडीसिव्हीर इंजेक्शन हे दोन दिवसांपासून मिळत नसून त्याचा पुरवठा होत नसल्याचे समोर आले आहे.
45 वर्षावरील रुग्णांना एकूण 14 लाख लसीचे डोस हवे असून जिल्ह्यात 27 हजार डोस आहेत. यामुळे अनेक लसीकरण केंद्रावर बंधने असल्याचे दिसून आले आहेत.
स्थानिक प्रशासनातर्फे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न केले जात असून रेमडीसिव्हीर इंजेक्शन हे कुठल्याही मेडिकल वर जास्त किंमतीत किंवा साठेबाजी करू नये अन्यथा कारवाई करण्यात येईल असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.
जळगाव आपत्ती व्यवस्थापन संपर्क क्रमांक –
>> आपत्ती व्यवस्थापन कक्ष – (0257) 2217193, 2223180
>> अधिष्ठाता, वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव – (0257) 2222917 / 9511633626
>> निवासी उपजिल्हाधिकारी, जळगाव – 9860142073
>> जिल्हा सामान्य रुग्णालय, जळगाव – (0257) 2226611
>> जिल्हा शल्य चिकित्सक, जळगाव – 9325070099 / 7020949528
>> जिल्हा आरोग्य अधिकारी – 8605292537
>> समन्वय अधिकारी (कोरोना) – 7038918552 / 8208333960
अधिक माहितीसाठी जळगाव पालिकेच्या या संकेतस्थळाला भेट द्या
https://jalgaon.gov.in/notice/corona-virus-covid-19-disaster-management-contact-numbers/
जळगावातील कोरोना रुग्ण
>> जळगाव शहर एकूण सक्रिय रुग्ण – 2571
>> एकूण जिल्ह्यातील सक्रिय रुग्ण संख्या – 11656
>> आज झालेल्या चाचण्या – 8418
>> मृत्यू दर – 1.80 टक्के
>> रिकव्हरी दर – 85.83 टक्के
जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या – 91327
एकूण मृत्यू – 1653
जळगावातील कोरोनाचे हॉटस्पॉट
चोपडा, जामनेर, अमळनेर, जळगाव, भुसावळ हे तालुके हॉटस्पॉट आहेत.
रात्रीची संचारबंदी सुरू असून राज्यशासनाने लागू केलेले नियम लागू करण्यात येणार आहेत.
शहारतील दाणा बाजार, सुभाष चौक, भाजी मंडई आणि कृषी उत्पन्न बाजार समिती जळगाव या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे.
कोरोना रुग्ण व हॉस्पिटल प्रमुख माहिती
डॉ. उल्हास पाटील वैदयकिय रुग्णालय, जळगाव
एकूण बेड – 400
किती रुग्ण अँडमिट – 200
किती बेड शिल्लक- 15
आँक्सिजन बेड शिल्लक- 00
व्हेंटीलेटर बेड शिल्ल्क- 15
इकरा वैद्यकीय महाविद्यालय
एकूण बेड – 120
किती रुग्ण अँडमिट – 83
किती बेड शिल्लक- 13
आँक्सिजन बेड शिल्लक- 09
व्हेंटीलेटर बेड शिल्ल्क- 11
गुलाबराव देवकर वैद्यकीय रुग्णालय
किती रुग्ण अँडमिट – 2560
किती बेड शिल्लक- 11
आँक्सिजन बेड शिल्लक- 14
व्हेंटीलेटर बेड शिल्ल्क- 00
शासकीय वैदयकिय रुग्णालय, जळगाव
एकूण बेड – 368
किती रुग्ण अँडमिट – 368
किती बेड शिल्लक- 18
आँक्सिजन बेड शिल्लक- 314
व्हेंटीलेटर बेड -36

