बेड्सची उपलब्धता ते कोरोना चाचणी केंद्र, औरंगाबादमधील कोरोनाची स्थिती काय?

0 झुंजार झेप न्युज

औरंगाबादमध्ये कोरोना चाचणी करण्यासाठी औरंगाबाद जिल्हा रुग्णालयासह इतर केंद्रांची माहिती आयसीएमआरच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. 

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. औरंगाबाद महापालिका क्षेत्रात काल 946 नवे रुग्ण सापडले, तर 5 कोरोनाबाधितांना प्राण गमवावे लागले आहेत. औरंगाबादमधील सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्णसंख्या 17 हजारांच्या वर गेली आहे. आतापर्यंत औरंगाबाद महापालिका क्षेत्र धरुन जिल्ह्यात 92 हजारांपेक्षा जास्त व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. तर 72 हजार 754 रुग्ण उपचारांनंतर बरे झाले आहेत. मात्र 1400 हून अधिक कोरोनाग्रस्त दगावले आहेत. उपचारासाठी खाजगी आणि सरकारी रुग्णालयात बेड मिळत नसल्याने रुग्णांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. 

बेड्सविषयी माहिती कशी मिळवाल?

http://www.aurangabadmahapalika.org या औरंगाबाद महापालिकेच्या वेबसाईटवर बेड्सची माहिती मिळवण्यासाठी माझी हेल्थ माझ्या हाती (MHMH – Mazi Health Mazya Hati) हे अॅप डाऊनलोड करण्याची लिंक देण्यात आली आहे.

https://aurangabad.gov.in/ या वेबसाईटवर 1921 या टोल फ्री क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यास सेल्फ असेसमेंट करणारा कॉल बॅक येईल, अशी माहिती वेबसाईटवर देण्यात आली आहे. आरोग्यसेतू अॅप प्रमाणे तुमच्या प्रकृतीविषयी रेकॉर्डेड कॉलमधून प्रश्न विचारण्यात येईल आणि तुमच्या आरोग्याची माहिती देणारा एसएमएस पाठवला जाईल, असेही यात नमूद करण्यात आले आहे. परंतु 1921 वर मिस्ड कॉल दिल्यानंतर कोणताही कॉल बॅक अर्ध्या तासाच्या आत आला नाही. त्यामुळे सामान्य नागरिकांनी कुठे संपर्क करायचा हा प्रश्न आहे.

औरंगाबादमध्ये कोरोना चाचणी कशी होते? 

औरंगाबादमध्ये कोरोना चाचणी करण्यासाठी औरंगाबाद जिल्हा रुग्णालयासह इतर केंद्रांची माहिती आयसीएमआरच्या वेबसाईटवर (https://covid.icmr.org.in/) उपलब्ध आहे. याशिवाय खासगी लॅबमध्येही कोव्हिड चाचणी उपलब्ध आहे.

कुठे कुठे चाचणी (प्रमुख केंद्रे) 

– कमलनारायण बजाज हॉस्पिटल पॅथॉलॉजी लॅब, औरंगाबाद

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ

– शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद

– एमजीएम सेंट्रल पॅथॉलॉजी लॅब, औरंगाबाद

(चाचणीला जाण्यापूर्वी 1075 क्रमांकावर उपलब्धता पाहावी)

औरंगाबादमध्ये टेस्ट कशी होते, किती वेळ लागतो, रांगा आहेत का?

औरंगाबादमध्ये RTPCR आणि अँटिजन टेस्ट केली जाते. अहवाल येण्यासाठी 24 ते 48 तास लागतील, असं सांगितलं जातं. 

एखाद्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर रुग्णाने कुठे जायचं?

रुग्णाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला सौम्य लक्षणं असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गृह विलगीकरणात राहता येते. लक्षणे जास्त असल्यास कोव्हिड केअर सेंटरला भरती करण्यात येते.

रुग्णांना कुठे पाठवलं जातं? कोव्हिड सेंटर किंवा तत्सम

ज्यांना खाजगी रुग्णालयात जायचं असेल ते तिकडे जाऊ शकतात किंवा मग कोव्हिड केअर सेंटर उभारले आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.