पैठण तालुक्यातील विहामांडव्यात वादळी वाऱ्यासह पाऊस अनेक कोलमडून पडली.
औरंगाबाद:(किशोर धायकर पैठण प्रतिनिधी).तालुक्यातील विहामांडवा येथे रविवारी दुपारी दीड वाजता अवकाळी पावसाने हजेरी लावली. यावेळी इंद्रा नगर भागातील रमेश शिकारे यांच्या घरासमोरील लिंबाचे झाड या वादळी वाऱ्यात घराच्या बाहेरच्या बाजूने पाडल्याने सुदैवाने कोणतीही जीवित व आर्थिक हानी झाली नाही काही . या अवकाळी पावसामुळे वातावरणा मध्ये खुप गारवा निर्माण झाला होता. ढगाळ हवामानासह वादळी पावसाचे आणि काही प्रमाणात गारपीट चा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता.रविवारी दुपारी जोरदार वार्यासह पावसाची सुरवात झाली. दुपारच्या सुमारास जोरदार पाऊस झाला तसे दिवसभर पवातावरण नव्हते. पन दुपारी मात्र अचानक ढगाळ हवामान होऊन काहीच वेळात पाऊस सुरू झाला. यावेळी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. दरम्यान वादळी वार्यामुळे गावातील वीजपुरवठा बंद झाला होता .
पावसाने गावातील सखल भागात चांगलेच पाणी साचले होते.
या अवकाळी होत असलेल्या पावसामुळे पिकांना मात्र फटका बसला आहे. अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान होत आहे. या पावसाचा फळबागांनाही फटका बसला आहे. तर नुकसान भरपाइ करण्याची मागणी परसिरातील शेतकऱ्यांनी केली आहे
विहामांडवा येथे दुपारी झालेल्या वादळी पावसात इंद्रा नगर भागातील रमेश शिकारी यांच्या घरासमोरील लिंबाचे झाड उन्मळून घराच्या बाहेरच्या दिशेने पडले सुदैवाने कोणतीही जीवित आणि आर्थिक हानी झाली नाही.

