सोमवारपासून (28 जून) अनलॉकच्या निर्बंधात बदल

0 झुंजार झेप न्युज

कोरोनाच्या डेल्टा प्लस या व्हेरिएंटचा धोका पाहता राज्य सरकारकडून जारी करण्यात आलेल्या निर्देशांनुसार कल्याण-डोंबिवलीतही आता कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

कल्याण (ठाणे) : कोरोनाच्या डेल्टा प्लस या व्हेरिएंटचा धोका पाहता राज्य सरकारकडून जारी करण्यात आलेल्या निर्देशांनुसार कल्याण-डोंबिवलीतही आता कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी सोमवारपासून निर्बंधांमध्ये बदल करण्यात आल्याची माहिती दिली. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीची उपाययोजना म्हणून केडीएमसी हद्दीत लेव्हल तीन अंतर्गत सोमवारपासून (28 जून) अनलॉकच्या निर्बंधात बदल करण्यात आले आहेत. हे बदल 5 जुलैपर्यंत असतील, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे.

केडीएमसी हद्दीत पुढच्या आठवड्यात नेमकं काय सुरु, काय बंद?

1) अत्यावश्यक सेवेतील दुकाने आणि आस्थापना सकाळी 7 ते सायंकाळी 4 वाजेर्पयत सुरु राहतील.

2) अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकानेही सकाळी 7 ते सायंकाळी 4 वाजेर्पयत खुली राहतील. ही दुकाने शनिवारी आणि रविवारी बंद ठेवण्यात येतील.

3) मॉल्स, थिएटर, चित्रपटगृहे पूर्णपणे बंद राहतील.

4) हॉटेल, बार आणि रेस्टॉरंट सकाळी 7 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत भोजनासाठी 50 टक्के आसन क्षमतेनुसार सुरु राहतील. तसेच 4 वाजल्यानंतर होम डिलिव्हरी आणि पार्सल सेवा बंधनकारक राहील.

5) सार्वजनिक ठिकाणे, मैदाने, चालणे, सायकलिंग, खेळ यासाठी पहाटे 5 ते सकाळी 9 वाजेचा वेळ देण्यात आला आहे.

6) खाजगी कार्यालये सोमवार ते शुक्रवार सायंकाळी चार वाजेपर्यंत खुली ठेवता येतील. सरकारी कार्यालयांना 50 टक्के क्षमतेची मर्यादा असेल.

7) सामाजिक, राजकीय, मनोरंज सभारंभ सोमवार ते शुक्रवार सायंकाळी चार वाजेपर्यंत 50 टक्के क्षमतेने करता येतील. लग्नास 50 व्यक्तींना उपस्थीत राहण्याची अनुमती आहे.

8) सार्वजनिक बस वाहतूक शंभर टक्के क्षमतेने सुरु राहिल. उभे राहून प्रवास करता येणार नाही.

9) एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात खाजगी बस, कार, टॅक्सीने जाण्यासाठी ई पास लागेल.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.