पिंपरी चिंचवड येथे सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवती काँग्रेसतर्फे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले.

0 झुंजार झेप न्युज
बारामती लोकसभा मतदार संघाच्या लोकप्रिय संसदरत्न खासदार आदरणीय सौ. सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवती काँग्रेसतर्फे वृक्षारोपण कार्यक्रमाचे
आयोजन केले.


पिंपरी चिंचवड: बारामती लोकसभा मतदार संघाच्या लोकप्रिय खासदार आदरणीय सौ. सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताचे औचित्य साधून आज राष्ट्रवादी युवती काँग्रेसतर्फे आज पिंपरी चिंचवड शहरात विविध ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम दापोडी , सांगवी,लांडेवाडी,भोसरी,दिघी,
चिखली तसेच विकासनगर येथे पार पडला, या कार्यक्रमास भोसरी विधानसभेचे प्रथम आमदार विलासशेठ लांडे पाटिल , नगरसेवक विक्रांत लांडे , मा. नगरसेवक प्रशांत शितोळे , प्रवक्ते फजलभाई शेख़ , अरुण बोऱ्हाडे , प्रकाश सोमवंशी, सारिकाताई पवार, अजय चव्हाण,पोपट पडवळ, उज्वला ढोरे, माहेश्वरी परान्ड़े, राधिका घोडके, मनिषा पूरी, कोमल कवडे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच अंध शाळेतील मुलांचाही सहभाग होता.या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी युवती काँग्रेस अध्यक्ष वर्षा जगताप तसेच ऋतुजा बिराजदार ,नेहा पडवळ लालबी शेख़ लोखंडे,शलाका बनकर, सोनाली घाडगे,श्रद्धा कुटे, तृप्ती गोरे, राजश्री आहिरे, अंकिता इथापे, भव्यशीला गायकवाड, रविराज काळे यांनी केले होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.