हॉटेल मालकाशी भांडण केले म्हणून कोयत्याने मारहाण..
पिंपरी,चिंचवड दि.29: पिंपरीतील हॉटेल गरीबनवाज येथे सोमवारी दुपारी चार वाजताच्या दरम्यान फिर्यादीसह त्यांचे दोन मित्र बिर्याणी खाण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांचा हॉटेल मालकासोबत किरकोळ कारणांवरून वाद झाला.
त्यावेळी अन्य आरोपी तिथे आले, तू मालकासोबत का भांडण करतो, असे म्हणून फिर्यादी आणि त्यांच्या एका मित्राला शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. जवळच पडलेला ट्रे फिर्यादी आणि त्यांच्या मित्रांच्या डोक्यात मारला. तसेच एका आरोपीने कोयता काढून फिर्यादीच्या डोक्यात मारून जखमी केले.
आशिष बाळू राऊत (वय २१, रा. मिलिंदनगर, पिंपरी) यांनी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गरीबनवाज हॉटेलचा मालक आणि इतर तीन ते चार इसम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

