सराईत गुन्हेगाराच्या डोक्यावर कोयत्याने सपासप वार; निर्घुण खून.

0 झुंजार झेप न्युज

सराईत गुन्हेगाराच्या डोक्यावर कोयत्याने सपासप वार; निर्घुण खून..

पिंपरी (दि. २८ जून २०२१) :- मयत तरून हा रविवारी मित्रांसोबत रहाटणी येथील त्याच्या बहिणीकडे गेला होता. त्यावेळी कारमध्ये आलेल्या आरोपींनी त्याच्यावर हल्ला केला. अचानक हल्ल्यामुळे मयताच्या मित्रांनी त्याला सोडून पळ काढला. आरोपींनी त्याच्या डोक्यावर कोयत्याने सपासप वार केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

निशांत सुरवसे (वय २२, रा. सज्जनगड, राहटणी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा घटनास्थळी दाखल झाले. वर्चस्ववादातून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवला जात आहे.

निशांत सुरवसे हा सराईत गुन्हेगार होता. त्याच्यावर वाकड पोलीस ठाण्यात गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. वाकड पोलिसांनी रात्री उशिरा काही संशयितांना ताब्यात घेतले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.