ब्रेमन चौकातील लहान मुलांच्या वाहतूक पाठशाळेचे लोकार्पण.!

0 झुंजार झेप न्युज

पुणे महानगरपालिकेच्या वतीने औंध येथे उभारण्यात आलेल्या चिल्ड्रन ट्रॅफिक पार्कचे उदघाटन राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाले.

पुणे : महानगरपालिकेच्या वतीने औंध येथे उभारण्यात आलेल्या चिल्ड्रन ट्रॅफिक पार्कचे उदघाटन राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाले.लहान मुलांना रस्ते, ट्रॅफिक तसेच वाहतुकीच्या नियमांचे शिक्षण मिळावे,या उद्देशातून सुसज्ज अशा चिल्ड्रनपार्कची निर्मिती करण्यात आली आहे.

पुणे महापालिकेच्या माध्यमातून हा ट्रॅफिक पार्क उभारण्यात आला आहे.लहान मुलांच्या मनावर वाहतूक नियम पाळण्याचे संस्कार व्हावेत तसेच वाहतुकीचे नियम पाळणारी संस्कारक्षम नवी पिढी निर्माण करण्यासाठी चिल्ड्रन्स ट्राफिक पार्कची मदत होणार आहे.

यावेळी.प्रदेशाध्यक्ष आमदार,मा.चंद्रकांतदादा पाटील,पुण्याचे महापौर,मा.मुरलीधर मोहोळ,उपमहापौर मा.सौ.सुनिता परशुराम वाडेकर,शहराध्यक्ष मा.जगदीश मुळीक,आमदार.मा.सिद्धार्थ शिरोळे,आमदार.मा.सुनिल कांबळे,ओबीसी मोर्चा अध्यक्ष.मा.योगेश टिळेकर,सभागृह नेते.मा.गणेश बिडकर,नगरसेवक.मा.प्रकाश ढोरे,नगरसेविका अर्चनाताई मुसळे व सर्व नगरसेवक व मनपा अधिकारी स्थानिक नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.