कुदळवाडीत डेंग्यू, मलेरियाच्या संशयित रुग्णांमुळे नागरिकांमध्ये घबराट.जलद ताप सर्वेक्षणासाठी टीमची नियुक्ती करा - दिनेश यादव

0 झुंजार झेप न्युज

कुदळवाडीत डेंग्यू, मलेरियाच्या संशयित रुग्णांमुळे नागरिकांमध्ये घबराट.जलद ताप सर्वेक्षणासाठी टीमची नियुक्ती करा - दिनेश यादव


पिंपरी चिंचवड,दि.12 जुलै : पावसाळ्यात डेंग्यू, कावीळ, अतिसार, मलेरिया यांसारख्या आजारांचे प्रमाण वाढतेय. कुदळवाडी परिसरातदेखील मलेरियासह तापाच्या पेशंटमध्ये लक्षणीय वाढ दिसू लागली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या अनुषंगाने 'फ' प्रभागाचे स्वीकृत नगरसदस्य दिनेश यादव यांनी 'फ' क्षेत्रीय अधिकारी सीताराम बहुरे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.  

निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, प्रभागात घाणीचे साम्राज्य आणि पाण्याच्या डबक्यांमुळे डासांची मोठ्या प्रमाणात पैदास होत असून, तेथील स्वच्छतेसाठी पालिका स्तरावर कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाहीत. त्यामुळे डेंग्यू, मलेरिया या संशयित पेशंटच्या संख्येत प्रभागात लक्षणीय वाढ झाली आहे.

उपचार सुरू असलेले पेशंट आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यासाठी प्रभागात धुरीकरण व औषध फवारणी, जलद ताप सर्वेक्षणासाठी टीमची नियुक्ती व तापाच्या पेशंटची नोंद घेण्यासाठी वैद्यकीय पथक नेमावे व नागरिकांमध्ये जनजागृती करावी, असे या निवेदनात यादव यांनी म्हटले आहे. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.