पीसीव्ही (न्युमोकोकल कॉज्युगेट) लसीकरण मोहिमेचा जिल्हाधिकारी यांचे उपस्थितीत शुभारंभ एक वर्षाच्या आतील सर्व बालकांना लस द्यावी - जिल्हाधिकारी

0 झुंजार झेप न्युज

जिल्ह्यात 1200 डोस प्राप्त

वर्धा,दि.14 जुलै : केन्द्र सरकारच्या मार्गदर्शक सुचनानुसार लहान मुलांना न्युमोकोकल आजारापासुन सुरक्षीत ठेवण्याकरीता न्युमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सीन (पी.सी व्ही) या लसीचा नियीमत लसीकरणात समावेश करण्यात आला असुन, जिल्ह्यात जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांच्या हस्ते जिल्हा सामान्य रुग्णालय येथे या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ आज करण्यात आला. एक वर्षाच्या आतील बालकांना ही लस मोफत देण्यात येत असून पालकांनी या लसीकरण मोहिमेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे. 

सार्वजनिक आरोग्य विभाग, वर्धा यांचेवतीने लसीकरण मोहीम एक वर्षाच्या आतील बालकांसाठी राबविण्यात येत आहे. 

भारतात १५ टक्के मृत्यू न्यूमोनियाने

भारतात दरवर्षी न्युमोनिया या आजारापासुन १५.०९ टक्के बालमृत्यु होतात.या आजारापासुन संरक्षण मिळण्याच्या हेतुने महाराष्ट्रात सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमातंर्गत पीसीव्ही या नवीन लसीकरणास सुरवात करण्यात आलेली आहे. ही लस दीड महिना, साडेतीन महिने झाल्यावर प्राथमिक डोस आणि नवव्या महिन्यात बूस्टर डोस अशा तीन डोस मध्ये दिली जाणार आहे.

146 देशात दिली जाते लस

स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनिया या जीवाणूमुळे मेनिंजायटीस, सेप्टिसीमिया , न्यूमोनिया, सायनुसायटीस हे गंभीर आजार होतात. या आजारापासून बालकांचा बचाव करण्यासाठी 

146 देशात पी सी व्ही लस दिली जाते. जेव्हा बालकांना पी सी व्ही लस दिली जाईल तेव्हा अन्य लसी सुद्धा वेळापत्रकाप्रमाणे देण्यात येणार आहेत. पी सी व्ही लस सुरक्षित तसेच बालकांसाठी प्रभावी असल्याचे संशोधनातून सिद्ध झाले आहे. 

जिल्ह्याला १२०० डोस प्राप्त

वर्धा जिल्हयाला पी सी व्ही लसीचे एकुण १२०० डोस प्राप्त झालेले असुन सर्व संस्थाना व सर्व प्राथमिक आरोग्य केन्द्राना लसीचे वाटप करण्यात आलेले आहे. तसेच सर्व वैद्यकीय अधीक्षक व आरोग्य कर्मचारी यांचे प्रशिक्षणही पूर्ण झाले आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली. 

आज शुभारंभ प्रसंगी आरोग्य व शिक्षण सभापती मृणाल माटे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अजय डवले ,अतिरीक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ प्रवीण वेदपाठक, जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी, डॉ.प्रभाकर नाईक, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.नितीन निमोदीया, डॉ.अभ्युदय मेघे विशेष कार्यकारी अधिकारी आचार्य विनोबा भावे,सांवगी मेघे, रुग्ण कल्याण समिती सदस्य हेमलता मेघे, डॉ.शुभदाजाजु, डॉ.मोना सुने उपसथित होते. डॉ.संदीप नखाते, कल्पना वलगावकर,कल्पना टवलारे,पदमा शेन्डे अधिपरिचारीका,अधिकारी व कर्मचारी यांनी या कार्यक्रमास सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.