जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणुन डॉ. विजय राठोड यांनी स्वीकारला पदभार

0 झुंजार झेप न्युज

जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणुन डॉ. विजय राठोड यांनी स्वीकारला पदभार

जालना दि.14 : जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांची बदली महानगरपालिका, पुणे येथे झाल्याने त्यांच्या जागी जालन्याचे जिल्हाधिकारी म्हणुन डॉ. विजय राठोड यांनी आज दि. 14 जुलै, रोजी पदभार स्वीकारला. 

 डॉ. विजय राठोड हे 2014 च्या बॅचचे सनदी अधिकारी असुन ते बीड जिल्ह्यातील गेवराई येथील रहिवासी आहेत. जालना येथे जिल्हाधिकारी म्हणून रुजू होण्यापूर्वी डॉ. राठोड यांनी दर्यापुर जि. अमरावती येथे उप विभागीय अधिकारी, आदिवासी विकास विभागामध्ये प्रोजेक्ट मॅनेजर, धारणी (मेळघाट) येथे उप विभागीय अधिकारी म्हणून तर गडचिरोली येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदी काम केले आहे. डॉ. विजय राठोड यांनी मीरा भाईंदर येथील महालिकेमध्ये आयुक्त म्हणुनसुद्धा यशस्वीरित्या जबाबदारी पार पाडली आहे. 

यावेळी मावळते जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी डॉ. विजय राठोड यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.