लग्नाचे आमिष दाखवून 16 वर्षे मुलीवर बलात्कार
खंडाळा ता.(किशोर धायकर पैठण प्रतिनिधी) : पैठण येथील एका 16 वर्षीय मुलीवर लग्नाचे आमिष दाखवून सात महिन्यांपासून बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की खंडाळा येथील 16 वर्षीय मुलीला मागील सात महिन्यांपासून थेरगाव येथील विजय आहेर या युवकानी ओळख प्रस्थापित केली. या ओळखीचे रुपांतर प्रेमात करून मी तुझ्यासोबत लग्न करतो हे आश्वासन देऊन वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यानंतर मुलीने लग्नाचा तगादा लावल्यानंतर मुलाने टाळाटळ करत मुलीकडे जाणे टाळले. यानंतर मुलीने त्या मुलाशी साधण्याचा प्रयत्न केला होत नसल्याने त्या मुलीने थेरगाव येथील विजय आहेर ह्या युवका वर व अन्य एका युवका वर पाचोड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला असून एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून
अन्य एका आरोपीवर तपास चालू असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोड पोलिस करत आहे.
