पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात पित्ताशयाच्या कर्करोगाची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी..

0 झुंजार झेप न्युज

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात पित्ताशयाच्या कर्करोगाची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी..

पिंपरी चिंचवड : शबाना (नाव बदलले आहे), वय ६० वर्षे या मागील सहा महिन्यांपासून पोटाच्या दुखण्याने त्रस्त होत्या. मूळच्या उत्तरप्रदेशच्या असलेल्या शबाना यांची आर्थिक परिस्थिती बिकट होती. मागील सहा महिन्यांमध्ये त्यांनी विविध खासगी रुग्णालयात उपचार घेतले, परंतु त्यांच्या दुखण्यात काही सुधारणा दिसून आली नाही. शेवटी त्यांनी महापालिकेच्या पदव्युत्तर संस्था यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम रुग्णालय) सर्जरी विभागाचे प्राध्यापक व विभागप्रमुख डॉ. बालाजी धायगुडे यांची ओपीडीमध्ये भेट घेतली. डॉक्टरांनी सर्व लक्षणांची सखोल तपासणी केली व त्यांना आंतररुग्ण विभागात भरती केले. त्यांच्यावर वेगवेगळ्या स्वरुपाच्या चाचण्या केल्या, त्यात पोटाचा सीटी स्कॅन,MRCP व रक्ताशी संबंधित कर्करोगाच्या तपासण्या करण्यात आल्या. तपासणीअंती त्यांना पित्ताशयामध्ये स्टोन व पित्ताशयाचा कर्करोग असल्याचे निदान करण्यात आले. या आजाराबद्दल रुग्णाचे नातेवाईकांना सविस्तर माहिती दिली व आवश्यक शस्त्रक्रियेसंबंधी समुपदेशन केले. दि. ५ ऑक्टोबर २०२१ रोजी शबाना यांचेवर वायसीएम रुग्णालयात अत्यंत गुंतागुंतीची व जोखमीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. ही शस्त्रक्रिया सुमारे ५ तास चालली. सदर रुग्ण सध्या स्वस्थ असून वेगाने रिकव्हर होत आहे.

ही शस्त्रक्रिया डॉ. बालाजी धायगुडे, प्राध्यापक व विभागप्रमुख, सर्जरी विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. भूलशास्त्राचे प्राध्यापक व विभागप्रमुख डॉ. मारोती गायकवाड, डॉ. आनंद झिंगाडे, डॉ. कांचन वायकोळे, डॉ. दिपक पाटील, डॉ. हर्षद गावडे, डॉ. अक्षय म्हसे, डॉ. मनीषा सपाटे, डॉ. शीतल काटोरे-घंगाले, डॉ. राजीव बिलास्कर, डॉ. पृथ्वी पटेल, डॉ. प्रांजळ पिंपरकर, डॉ. प्रियांका कोनघे यांनी शस्त्रक्रिया यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.

पदव्युत्तर संस्था वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांनी सांगितले की, महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये आता पदव्युत्तर पदवी संस्था कार्यरत झाल्यामुळे अध्यापक डॉक्टरांच्या रुपाने निष्णात मनुष्यबळ उपलब्ध झाले आहे. त्यांच्या सहकार्याने व योग्य उपकरणांच्या साह्याने अशा गुंतागुंतीच्या व जोखमीच्या शस्त्रक्रिया यशस्वी होत आहेत. भविष्यात आणखी लोकाभिमुख सुविधा पुरविण्याचा संस्थेचा मानस असून त्यादृष्टीने मा. आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य प्रगतिपथावर आहे.  

या शस्त्रक्रियेसंबंधी डॉ.संतोष थोरात, सहयोगी प्राध्यापक, सर्जरी विभाग यांनी सांगितले की, Gall Bladder Cancer – पित्ताशयाचे कॅन्सर हे भारतात जगाच्या एकूण प्रमाणापैकी १०% एवढ्या जास्त प्रमाणात आढळतात, जास्त करुन दक्षिण-पूर्व भारतात या प्रकारच्या कर्करोगाचे रुग्ण जास्त आहेत. जवळपास ८०% केसेसमध्ये पित्ताशयाच्या कर्करोगासोबत पित्ताशयाचे खडेसुध्दा असतात. कमी आर्थिक उत्पन्न असलेल्या लोकांमध्ये जीवनशैलीतील हानिकारक सवयीमुळे या प्रकारचे कर्करोग होऊ शकतात. याव्यतिरिक्त

सल्मोनेल्ला टायफोईड (Salmonella Typhoid) संसर्ग

हेलीकोबाक्टर संसर्ग (H. PYLORI)

अवजड धातू (Heavy Metals)शी संपर्कात काम करणे

प्रदुषित पाणी, खास करुन औद्योगिक कारखान्यातून निचरा होणारे द्रव्य व त्याचे प्रदूषण

धुम्रपान

दुषित Adultared) मोहरीचे स्वयंपाकाचे तेल

पित्ताशयाचे खडे जास्त काळ पित्ताशयामध्ये राहिल्याने पित्ताशयाच्या मुकॉसाला वारंवार दुखापत करुन कर्करोगास कारणीभूत ठरतात.

अशा रुग्णांमध्ये वेळीच तपासण्या करुन Gall Bladder / पित्ताशयाच्या सोबत Liver / यकृताचा काही भाग काढावा लागतो. तसेच त्यासंबंधीत असलेल्या सर्व Lymph Nodes सुध्दा काढावे लागतात. ही शस्त्रक्रिया गुंतागुंतीची व जोखमीची असते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.