नविन भोसरी रुग्णालयातील आयसीयु विभागाचे उद्घाटन खासदार शरद पवार यांच्या हस्ते आणि महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.

0 झुंजार झेप न्युज

नविन भोसरी रुग्णालयातील आयसीयु विभागाचे उद्घाटन खासदार शरद पवार यांच्या हस्ते आणि महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.

पिंपरी चिचवड,16 ऑक्टोबर : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नवीन भोसरी रूग्णालयातील आय.सी.यू विभागाकरीता कॅप जेमिनी कंपनीने सी.एस.आर.फंडातून दिलेल्या १६ बेडसचे लोकार्पण खासदार शरद पवार यांच्या हस्ते आणि महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.

या कार्यक्रमास खासदार डॉ.अमोल कोल्हे, स्थायी सभापती अड. नितीन लांडगे, माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर संजोग वाघेरे, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, नगरसदस्य अजीत गव्हाणे, रवी लांडगे, विक्रांत लांडे, नगरसदस्या अनुराधा गोफणे, सारीका लांडगे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.पवन साळवे, सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.लक्ष्मण गोफणे, कॅप जेमिनी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद शेटटी, ‍सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलजा भावसार, डॉ.निलेश ढगे, आदी मान्यवर उपस्थित होते.

कॅप जेमिनी कंपनी कडून आज महानगरपालिकेस १० आय.सी.यू यूनीट, ६ व्हेन्टीलेटर, १० मोनिटर, १० सिरींज पंप, १० बेड साईड लॉकर, १ हाई पॉवर एक्सरे मशीन, १ सोनोग्राफी मशीन, २ बायोमेडीकल वेस्ट कंटेनर, १वॉटर प्यूरीफायर, आदी सुमारे २ कोटी ५० लाखाची साहीत्य सी एस आर फंडातून सुपुर्द करण्यात आले.

कार्यक्रमाचे सुञसंचालन माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.