भरपाई द्या ; अन्यथा जलसमाधी घेऊ चिंचाळा येथील शेतकऱ्यांचा इशारा

0 झुंजार झेप न्युज

भरपाई द्या ; अन्यथा जलसमाधी घेऊ चिंचाळा येथील शेतकऱ्यांचा इशारा

विहामांडवा,(किशोर धायकर पैठण प्रतिनिधी) : अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून , सरकारने पैठण तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा . मागच्या वर्षीचा अतिवृष्टीचा राहिलेला दुसरा हप्ता दिवाळीपूर्वी द्यावा ; अन्यथा जायकवाडी धरणात जलसमाधी घेण्याचा इशारा चिंचाळा येथील शेतकरी विजयसिंग बोडखे पाटील यांनी दिला आहे . ' मी माझ्या शेतात चार एकर शेतात कापसाची लागवड केली होती . पावसाळ्याच्या सुरुवातीला चांगला पाऊस पडल्याने पिकांची

चांगली वाढ झाली होती . मात्र , सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या व ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला अतिवृष्टी झाल्याने माझ्या शेतातील कापसाच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे . सध्या , चार एकर पैकी केवळ दहा गुंठ्यांतील पीक सुरक्षित असून आता लागवडीचाही खर्च निघणे मुश्किल झाला आहे , 

अशी प्रतिक्रिया शेतकरी विजयसिंग बोडखे यांनी दिली . यामुळे मी तहसीलदार साहेबाना निवेदन दिले आहे . ' मी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात , सगळीकडे अतिवृष्टी झाल्याने पैठण तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा . व मागच्या वर्षीचा अतिवृष्टीचा राहिलेला दुसरा हप्ता त्वरित देण्याची मागणी केली आहे . मागण्या पूर्ण न झाल्यास मी जायकवाडी धरणात जलसमाधी घेण्याचा इशारा दिला आहे , ' असेही बोडखे यांनी सांगितले .

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.