अवैध मुरूम उत्खनन थाबवा अन्यथा आंदोलन - युवा कामगार सेना
पैठण : तालुक्यातील ब्रम्हगाव येथील पाझर तलावातून मोठ्याप्रमाणात अवैध मुरूम उत्खनन केले जात असुन सदरचा अवैध उचललेला मुरूम इंदेगाव येथील ग्रामपंचायच आपल्या कामासाठी वापरत असल्याचे निदर्शनास आल्याने युवा कामगार सेनेचे औरंगाबाद जिल्हा उपाध्यक्ष श्री बाळासाहेब गागरे यांनी युवा कामगार सेनेचे प्रदेश अध्यक्ष दशरथ भाई आडसुळ यांच्या नेतृत्वाखाली पैठण तहसील कार्यालयाचे अव्वल कारकून श्री राजू शिंदे यांना निवेदन देऊन संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अन्यथा औरंगाबाद युवा कामगार सेनेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर तीवृ आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे. निवेदनात पुढे म्हटले आहे की अशा प्रकारे अवैधरित्या विनापरवाना सुरू असलेल्या मुरुम उपसा करण्यात येत असल्याने शासनाचा महसूल मोठ्या प्रमाणात बुडत आहे.
या भागातील तलाठी यांच्याशी भ्रमणध्वनी वरून संपर्क साधला असता ते नाॅटरीचेबल होते .
या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव , महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात, औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुभाष देसाई महसूल विभागाचे प्रधान सचिव,
विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी यांना देण्यात आल्या आहेत.
