श्री रेणुकादेवी शरद कारखान्याचा बॉयलर पेटला !

0 झुंजार झेप न्युज

• तीन लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे नियोजन.

विहामांडवा,(किशोर धायकर पैठण प्रतिनिधी) : श्रीक्षेत्र चोंडाळा ता.पैठण येथील श्री रेणुकादेवी शरद सहकारी साखर कारखान्याच्या २०२१-२२ च्या सहाव्या गळीत हंगामाची बोयलर अग्निप्रदीपनचा कार्यक्रम दि. १८ ऑक्टोंबर 2021 सोमवार रोजी सकाळी १० वाजता कारखान्याचे चेअरमन तथा राज्याचे रोहयो व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे कारखान्याचे संचालक लहू पा.डुकरे व कल्याण धायकर यांच्या हस्ते सपत्नीक यांच्या शुभास्ते विधिवत पूजन संपन्न झाला. कारखान्याचे रिपेअर व मेंटेनन्स चे काम पूर्ण झाले असून कोरोणाच्या पार्श्वभूमीमुळे यंदाचा गळीत हंगाम अत्यंत साधेपणाने व मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीत २४ ऑक्टोबर पासून सुरू करणार असल्याचे यावेळी चेअरमन भुमरे यांनी सांगितले, ते बोलताना म्हणाले मागील महिन्यात झालेल्या वादळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे .त्यामुळे कारखाना लवकर सुरू करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे कार्यक्षेत्रातील संपूर्ण ऊस तोडणी होईपर्यंत कारखाना सुरू ठेवून पूर्ण क्षमतेने गाळप करणार आहे. तीन लाख मे. टनाचे उद्दिष्ट ठेवले आहे.यावेळी चेअरमन संदिपान भुमरे, रेणुकादेवी शुगर मिल चे दत्तात्रय रेवडकर, रोहिदास रेवडकर, मार्केट कमिटीचे चेअरमन राजू नाना भुमरे, विलास भुमरे दूध संघाचे संचालक नंदलाल काळे,व्हा. चेअरमन मानिकराव थोरे,अशोक भवर सुभाष चावरे.डॉ.सुरेश चौधरी,भरत तवार,सुरेश दुबाले, कल्याण धायकर, विष्णु नवथर,संदीपान काकडे,रावसाहेब घावट,महाविर काला,सोमनाथ परदेशी,लहु डुकरे,ज्ञानोबा बोडखे,दत्तात्रय वाकडे,सुभाष गोजरे, शेख महेबुब सालार पटेल,नंदु पठाडे,संचालक यांच्यासह,कार्यकारी संचालक नामदेव बावडकर,बाबुराब पडूळे,दादा बारे, बळीराम औटे, विहामांडवाचे माजी सरपंच अफसर भाई शेख ,सुनील डुकरे अंबादास नरवडे,प्रदीप नरके, श्रीमंत टेकाळे खाते विभाग प्रमुख अधिकारी-कर्मचारी व मोठ्या प्रमाणात ऊस उत्पादक शेतकरी सभासद उपस्थित होते.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.