जिल्हा न्यायालयात नाटिकेच्या सादरीकरणातून हुंडाबळी व स्त्रीभ्रृणहत्या विषयावर जनजागृती

0 झुंजार झेप न्युज

जिल्हा न्यायालयात नाटिकेच्या सादरीकरणातून हुंडाबळी व स्त्रीभ्रृणहत्या विषयावर जनजागृती

वाशिम,दि.27: आज 27 ऑक्टोबर रोजी जिल्हा न्यायालय येथे आझादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमांतर्गत श्री सरस्वती समाजकार्य महाविद्यालय वाशिम येथील एम.एस. डब्लु प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी बेटी बचाव बेटी पढाव, स्त्रीभ्रृण हत्या, हुंडाबळी आणि कौटुंबिक छळ या विषयावर नाटकाचे सादरीकरण केले. उपस्थितांना स्त्रीभ्रृण हत्या करणे गुन्हा आहे, विवाहीत स्त्रीचा छळ करु नये तसेच मुलगी शिकली तर कुटूंब शिकेल आणि कुटूंब शिकले तर समाज सुधारेल आणि पर्यायाने राष्ट्र उभारणीच्या कार्याला मदत होईल असा प्रभावी संदेश या नाटिकेमधून भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांनी उपस्थिताला दिला. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती एस.एस. सावंत हया होत्या. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव न्या. एस.पी. शिंदे, न्या. पी.पी. देशपांडे, न्या. श्रीमती एस.व्ही. फुलबांधे, न्या. पी.एच. नेरकर, न्या. आर.पी. कुलकर्णी, इतर न्यायीक अधिकारी, डॉ. रचना तेहरा व समाजकार्य महाविद्यालयाचे प्रा. श्री. राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती. न्यायालयीन कर्मचारी व पक्षकारांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक न्या. एस.पी. शिंदे यांनी केले. संचालन व उपस्थितांचे आभार ॲड. माधुरी वायचाळ यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.