प्रमोद धोंगडे यांचा जिल्हा माहिती अधिकारी जालना पदावर पदोन्नती निमित्त सत्कार

0 झुंजार झेप न्युज

प्रमोद धोंगडे यांचा जिल्हा माहिती अधिकारी जालना पदावर पदोन्नती निमित्त सत्कार

औरंगाबाद,दि.05 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या मराठवाडा विभागाचे सहाय्यक संचालक प्रमोद धोंगडे यांची जिल्हा माहिती अधिकारी, जालना पदावर पदोन्नती झाली. यानिमित्ताने विभागीय माहिती कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय व माहिती केंद्र औरंगाबाद कार्यालयांकडून आज श्री.धोंगडे यांचा यावेळी सत्कार करुन त्यांना निरोप देण्यात आला.

खडकेश्वर येथील संचालक माहिती कार्यालयात आज श्री. धोंगडे यांचा जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत यांनी पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन स्वागत केले. याप्रसंगी माहिती अधिकारी मीरा ढास, माहिती सहायक संजीवनी जाधव, श्याम टरके, तसेच तिन्ही कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. 

मराठवाडा विभागाच्या सहाय्यक संचालक पदाची सूत्रे जिल्हा माहिती कार्यालयातील माहिती अधिकारी मीरा ढास यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

श्री.धोंगडे यांनी यापूर्वी मंत्रालय, हिंगोली, अकोला, अमरावती, आदी ठिकाणी विविध महत्वाच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.