शिवसेने ला 5 वर्षे मुख्यमंत्री पद देऊन भाजप सोबत पुन्हा महायुती चे सरकार आणणे हीच दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना खरी अदारांजली ठरेल - केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले
मुंबई,दि.17 : शिवसेना भाजप आरपीआय महायुतीचे सरकार पुन्हा स्थपन करणे हीच शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना खरी अदारांजली ठरेल;त्यासाठी शिवसेनेला 5 वर्षे मुख्यमंत्री पद देऊन भाजप ला 50 टक्के सत्तेतील वाटा देऊन पुन्हा शिवशक्ती भीमशक्ती महायुती चे सरकार स्थापन करावे ; त्यासाठी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी; गृहमंत्री अमित शहा ;भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची आपण भेट घेणार असल्याचे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी आज प्रतिपादन केले.
दादर शिवजीपार्क येथे शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिना निमित्त त्यांच्या स्मृतिस्थळी ना.रामदास आठवले यांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र श्रद्धांजली अर्पण केली.
दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी शिवशक्ती भीमशक्ती भाजप महायुती ची एकजूट उभी केली होती.काँग्रेस राष्ट्रवादी ला हद्दपार करून भाजप शिवसेना आरपीआय शिवशक्ती भिम शक्ती महायुतीचे सरकार स्थापन करण्याचे दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते.ते साकार करण्यासाठी
पुन्हा भजप शिवसेने ने एकत्र यावे. त्यासाठी शिवसेनेला 5 वर्षे मुख्यमंत्री पद देऊन भजप ला 50 टक्के सत्तेतील सहभाग द्यावा या पर्यायावर भाजप आणि शिवसेना यांनी विचार करावा असे आवाहन ना रामदास आठवले यांनी केले.
