राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू धंद्याविरूद्ध नोंदविले 82 गुन्हे

0 झुंजार झेप न्युज

•73 आरोपींना केली अटक

बुलडाणा,दि.24: राज्य उत्पादन शुल्क विभागाने मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात अवैध दारू विक्री, साठवणूक व वाहतूकीविरोधात कारवाई केली आहे. विभागाचे नागपूरचे विभागीय उप-आयुक्त मोहन वर्दे व अधीक्षक श्रीमती भाग्यश्री पं.जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हयात 1 ते 23 नोव्हेंबर दरम्यान धडक मोहिमेत 82 गुन्हे नोंदविण्यात आले. तसेच 73 वारस गुन्हे, 9 बेवारस गुन्हे नोंदवून 73 आरोपींना अटक केली आहे. त्याचप्रमाणे 680 लीटर हातभट्टी, 10771 लिटर सडवा, 251 लीटर देशी दारू, 54 लिटर विदेशी दारू व 5 वाहनासह एकूण 17 लाख 89 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

धडक मोहिमेदरम्यान 23 नोव्हेंबर रोजी रांजणी शिवार ता. लोणार येथे सापळा लावून एक चार चाकी टाटा कंपनीच्या इंडिका कार क्रमांक एमएच 28 सी 4789 वर कारवाई करण्यात आली. यावेळी कारमध्ये 86 लिटर देशी दारूच्या बाटल्या मिळाल्या. ही कारवाई चिखलीचे निरीक्षक जी. आर गावंडे यांचे पथकाने केली. सदर कारवाईत सहायक दुय्यम निरीक्षक जी. व्ही पहाडे, जवान एस डी जाधव सहभागी होते. तसेच भरारी पथक बुलडाणाचे निरीक्षक आर. आर उरकुडे यांचे पथकाने एक हिरो होंडा कंपनीची मोटार सायकल हातभट्टी वाहतूक करताना जप्त करण्यात आली. या कारवाईत दुय्यम निरीक्षक पी. व्ही मुंगडे, जवान पी.ई चव्हाण, एन ए देशमुख, आर एस कुसळकर, अमोल तिवाने सहभागी होते.

आपल्या परीसरात अशी अवैध मद्य विक्रीची अथवा बनावट मद्य निर्मीती आढळल्यास विभागाचे टोल फ्री नंबर 1800833333 वर किंवा व्हॉट्अॅप नंबर8422001133 वर किंवा excisesuvidha. mahaonline.gov.in या विभागाचे पोर्टलवर माहिती कळविण्यात यावी. तसेच ज्याप्रमाणे वाहन चालविताना वाहनांचा परवाना आवश्यक आहे. त्याप्रमाणे मद्य बाळगतांना, मद्य सेवन, मद्य वाहतुक करतांनासुद्धा सदर विभागाचा मद्यसेवन परवाना असणे बंधनकारक आहे. अवैध ढाब्यांवर मद्यसेवन करताना अथवा मद्यविक्री करताना किंवा आपल्या जागेचा वापर अवैध ढाबा चालविण्यासाठी दिल्यास त्यावर महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 1949 चे कलमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा अधीक्षक श्रीमती भाग्यश्री जाधव यांनी दिला आहे.

कोरोना अलर्ट : प्राप्त 194 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 01 पॉझिटिव्ह 2 रूग्णांना मिळाली सुट्टी

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 195 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 194 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 01 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील चाचणी मधील 1 अहवालाचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 89 तर रॅपिड टेस्टमधील 105 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 194 अहवाल निगेटीव्ह आहेत.                                     

पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : मेहकर तालुका : अंजनी बु 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आली आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात 01 रूग्ण आढळला आहे. तसेच उपचाराअंती रूग्णालयातून 2 रूग्णांना सुट्टी मिळाली आहे.

त्याचप्रमाणे आजपर्यंत 736099 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86955 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 86955 आहे. आज रोजी 42 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 736099 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87644 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 86955 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 14 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 675 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.