सर्व लहान थोर मंडळीला योगिताताई नागरगोजे दिवाळीच्या यांच्याकडून खूप खूप शुभेच्छा
पिंपरी चिंचवड, दि.1: सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते की आत्ता दिवाळीचा सण आहे सर्वांना सुट्टी मिळेल यामध्ये जास्तीत जास्त फॅमिली गावाकडे , पाहुण्याकडे किंवा बाहेर देवधर्म करण्यासाठी जाणार , तेव्हा कृपया सर्वांनी घरामध्ये आपल्या मौल्यवान वस्तू पैसे अजिबात ठेवू नका जाताने येथे राहणाऱ्या शेजाऱ्याला किंवा जवळ असणाऱ्या नातेवाईकांना आपल्या घराकडे लक्ष ठेवण्यास सांगणे शक्य असेल तर ज्यांना दिवाळीनंतर ही जाता येईल अशा फॅमिली बाकीचे आल्यावर जावे श्री नम्र विनंती
सर्वांनी जातानी प्रवास काळजीपूर्वक करावा ,घाई गडबड अजिबात करू नये ,लहान मुलांकडे विशेष लक्ष द्या ते रस्त्यावर पाळणार नाहीत ,गाडीचे दरवाजे उघडे ठेवणार नाहीत याची आवर्जून काळजी घ्या ,गाडीची स्पीड कंट्रोलमध्ये ठेवा ,विनाकारण ओव्हर टेक करू नका , जाताने आणि येताना दोन तास जास्त वेळ लागला तरी चालेल पण सावकाश जा सावकाश या , *ड्रायव्हिंग करतेवेळी सर्वात महत्वाची घ्यावयाची काळजी* म्हणजे कोणत्याही परिस्थितीत बाजूला ,पाठीमागे बघून आजिबात बोलू नका , समोर पाहूनच ड्रायव्हिंग करावी आणि बोलावे कारण आपली ही छोटीसी चूक फार महागात पडू शकते , कॉर्नर ला ,चौकात ,आणि ओव्हरटेक करताना हॉर्न वाजवा आपल्या सेफ्टी चा पहिला विचार करूनच पुढे चला ,
सर्वांनीच पाहिले आहे , अनुभवले आहे की कारोना या महामरिने सर्व प्रकारचे धडे , शिक्षण , अनुभव दिला त्या अनुभवाचा विचार करून चला आणि वागा , जगा आणि जगू द्या , सुख मानल तरच आहे या कृतीचा ,वृत्तीचा स्वीकार करूनच चला ,वागा तरच भविष्य ,आयुष्य चांगले आहे हे विसरू नका ,विनाकारण कशालाही आजिबात बळी पडू नका ,दोन घास कमी खा ,दोन गोष्टी कमी मिळू द्या खरे सुख ,आनंद यातच आहे
आपल जे आहे त्याचा आनंदाने स्वीकार करून आनंद माना ,आणि आनंदित रहा खरे हेच जिवन आहे ,दुसऱ्याच्या मोठेपणा ,चुकीला ला आजिबात बळी पडू नका , किंवा काही चुकीचे करू नका , काही वेळा मुलं दुसऱ्याचे पाहून बोलतात हे पाहिजे ते पाहिजे म्हणून आप दुःखी होयाचे नाही ,किंवा विनाकारण ताण घेवून घेऊ ही नका , त्यांना प्रेरित करा तुला अस घेण्यासाठी ,करण्यासाठी तुला चांगलं शिकायचंय ,रोज अभ्यास करायायचाय , रोजची ,छोटी छोटी कामे करायची ,हे जर करायला लावले तर नक्कीच सर्व गोष्टी होतात हे कदापिही विसरू नका
फटाके होता होईल तेवढे कमी वाजा आणि वाजवताना काळजी घ्या
होता होईल तेवढा खर्च ही कमी करा ते आपल्याच फायद्याचे आहे.
