शिवशाही च्या राज्यात एस.टी. कर्मचाऱ्यांशी मोगलशाही सारखी वागणूक का ? : आप

0 झुंजार झेप न्युज

शिवशाही च्या राज्यात एस.टी. कर्मचाऱ्यांशी मोगलशाही सारखी वागणूक का ? : आप

पिंपरी चिंचवड,दि.11 : राज्यातील एस. टी. कर्मचाऱ्यांनी वेतनवाढी सह एस. टी. महामंडळाचे शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी पुकारलेल्या बेमुदत संपाला आम आदमी पार्टी, महाराष्ट्राने पाठींबा घोषीत केला आहे. वल्लभनगर आगारामध्ये चालू असलेल्या आंदोलमध्ये आम आदमी पार्टी, पिंपरी चिंचवड च्या पदाधिकाऱ्यांनी पत्र देऊन जाहीर पाठिंबा दिला.

एस. टी. कर्मचाऱ्यांच्या मागण्या ज्वलंत व रास्त असुन त्या सोडविण्याकरीता राज्य शासनाकडून सातत्याने होणारी दिरंगाई, संपाबाबत सकारात्मक भुमीका नसल्यामुळे, गावोगावी पोहोचलेली लालपरीचं खाजगीकरणाकडे होणारी वाटचाल पाहून आम आदमी पार्टी एस.टी. कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठींबा देत आहे व राज्य शासनाला विनंती करते की संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांवर कुठल्याही प्रकारची कठोर कार्यवाही करू नये.

आंदोलनांच्या ठिकाणी बोलताना "शिवशाही च्या राज्यात एस.टी. कर्मचाऱ्यांशी मोगलशाही सारखी वागणूक का दिली जात आहे?" असा सवाल स्वप्नील जेवले यांनी केला.

शहराचे कार्यकारी अध्यक्ष चेतन गौतम बेंद्रे, जनसंपर्क प्रमुख वैजनाथ शिरसाट, सागर सोनावणे, स्वप्नील जेवले आणि आदी कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.