शेवगाव तालुक्यात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिदिनानिमित्त पूरग्रस्त व गरजू विद्यार्थ्यांना २५० स्कुल बॅग वाटप करण्यात आले.

0 झुंजार झेप न्युज

शेवगाव तालुक्यात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिदिनानिमित्त पूरग्रस्त व गरजू विद्यार्थ्यांना २५० स्कुल बॅग वाटप करण्यात आले.

शेवगाव : आज अखंड हिंदुस्थानचे हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्राचे लाडके लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या कार्य कुशल नेतृत्वात शिवसेना सहसचिव तथा उपनेते मा. विश्वनाथजी नेरुरकर साहेब,संपर्कप्रमुख संजयजी घाडी, सह संपर्कप्रमुख डॉ विजय पाटील, विधानसभा संपर्क प्रमुख नंदकुमारजी मोरे, नगर दक्षिण जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली व शेवगाव तालुक्याचे शिवसेना नेते प्रा. शिवाजीराव काटे यांच्या साथीने शिवसेना शहर प्रमुख ऍड. सिद्धार्थ काटे, युवासेना तालुकाप्रमुख शितलशेठ पुरनाळे तालुकासंघटक महेश पुरनाळे विभागप्रमुख रामचंद्र झिंजूर्के आखेगावचे शाखाप्रमुख भगवानराव गोरडे त्याचबरोबर मित्रपरिवार व जिव्हाळा ग्रुप मार्फत सामाजिक उपक्रम म्हणून पूरग्रस्त व गरजू विद्यार्थ्यांना विविध गावांमध्ये स्कुल बॅग वाटप करण्यात आले. 

शेवगाव तालुक्यातील गावांमध्ये 31 ऑगस्ट रोजी पुरस्थितीत शेतकऱ्यांचे अतोनात हाल झाले, कित्येकांचे घरात पाणी जाऊन संसार उघड्यावर आला, मुकी जनावरे पुरात वाहून गेली अशा परिस्थितीत सर्वप्रथम प्रा. शिवाजीराव काटे यांच्या साथीने शेवगाव शिवसेना ,स्व किसनराव काटे पाटील शैक्षणिक संकुल आखेगाव , मैत्र पालवी ग्रुप शेवगाव यांच्या माध्यमातून पूरग्रस्तांना ब्लँकेट वाटप ,अन्न धान्य भाजीपाला वाटप करण्यात आला. पूरपरिस्थितीत प्रत्येकाला आधार देण्याचा प्रयत्न केला,यामागे विचार होता तो फक्त हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचाच आणि तो म्हणजे ८०% समाजकारण व २०% राजकारण होय . स्मृतिदिनानिमित्त गरजू व पूरग्रस्त विद्यार्थ्यांना स्कुल बॅग वाटप करण्यात आले. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हीच वंदनीय साहेबांना वाहिलेली सर्वोत्तम श्रद्धांजली असेल. शेवगाव तालुक्यात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर व निस्वार्थी शिवसैनिक म्हणून सर्वजण एकदिलाने शैक्षणिक ,सामाजिक व राजकीय तिन्ही क्षेत्रात कार्यरत असणारे आम्ही सामाजिक काम करण्यासाठी सज्ज आहोत व हिंदुहृदयसम्राटांचा विचार मानणारे तरुण, ज्येष्ठ आमच्याशी जोडले जात आहेत असे प्रा शिवाजीराव काटे यांनी सांगितले. जिरायत, दुष्काळी भाग म्हणून समजल्या जाणाऱ्या शेवगाव तालुक्यातील पूर्व भागातील गावांमध्ये 250 स्कुल बॅगचे वाटप करण्यात आले. हिंदुरुदय सम्राट वंदनिय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त नेहमीच समाजोपयोगी काम समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचे काम शेवगाव शिवसेना करत असते. कोरोना काळामध्ये विस्कळीत झालेली शैक्षणिक घडी त्याचबरोबर शाळेतील विद्यार्थ्यांची शिक्षणाविषयी तयार झालेली उदासीनता कमी करण्याच्या उद्देशाने त्याचबरोबर त्यांना अभ्यासाविषयी शैक्षणिक गोडी निर्माण व्हावी हा उद्देश समोर ठेवून हा प्रेरणा दिन निवडण्यात आला. त्याचा फायदा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व्हावा या उद्देशाने गावोगावी जाऊन हा उपक्रम राबविला. वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विषयी लोकांमध्ये तसेच विद्यार्थ्यांमध्ये असलेली उत्सुकता आणि जिव्हाळा या कार्यक्रमाच्या निमित्ताने जाणवला असे शेवगाव शिवसेना शहरप्रमुख ऍड. सिद्धार्थ काटे यांनी सांगितले.युवासेना तालुकाप्रमुख शितल पुरणाळे यांनी सर्वांचे आभार मानले.

संभाजीराजे पब्लिक स्कुल, आखेगाव, जि प प्राथमिक शाळा , वाडगाव,हसनापूर ,कोळगाव, मंगरुळ बु,मंगरुळ खु ,अधोडी इत्यादी गावांमध्ये स्कुल बॅग वाटप करण्यात आले. भविष्यात इतरही गावांमध्ये विविध सामाजिक उपक्रम घेण्याबाबत संघटना नियोजन करीत आहे असे सांगण्यात आले. या विविध ठिकाणच्या कार्यक्रमात जिव्हाळा ग्रुप व प्रा शिवाजीराव काटे मित्र परिवाराचे सुनील डोंगरे,सचिन झिंजुरके , गणेश रोकडे, दीपक अष्टेकर, रवींद्र चव्हाण,धर्मेंद्र जोशी,राज राठोड, संजय बढे,ज्ञानेश्वर गायकवाड ,संदीप गोर्डे, अमोल काटे,सर्जेराव जवरे,गणेश ढाकणे, सोमनाथ झिरपे,विशाल विघ्ने, निखिल पायघन, अविनाश बंड , चंद्रकांत फुंदे ,दीपक सानप,मनोहर मराठे, अरुण काटे, चांगदेव ढाकणे , बंडु ढाकणे, शिवदास गर्जे, येवले पांडुरंग, बाळासाहेब विघ्ने,श्री खंडागळे, राठोड सर ,गोरे सर , अक्षय बोडखे,लबडे सर, गरड सर ,विष्णूभाऊ काकडे यांनी नियोजन केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.