श्री.संत एकनाथ सहकारी साखर कारखाना- सचिन घायाळ शुगर प्रा.लि.पैठण सहाव्या गळीत हंगामा

0 झुंजार झेप न्युज

• श्री.संत एकनाथ सहकारी साखर कारखाना- सचिन घायाळ शुगर प्रा.लि.पैठण सहाव्या गळीत हंगामा पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उपस्थितीत पार पाडला

पैठण (किशोर धायकर पैठण प्रतिनिधी) : श्री.संत एकनाथ सहकारी साखर कारखाना- सचिन घायाळ शुगर प्रा.लि.पैठण सहाव्या गळीत हंगामा निमित्त आज बॉईलर पुजन व मोळी टाकण्याचा कार्यक्रम सर्व सभासद व पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उपस्थितीत पार पाडला.

प्रस्तावित भाषणात सचिनभैय्या घायाळ यांनी कारखान्याचा लेखा-जोगा मांडला, सन 2020- 21 मध्ये कारखान्याचा गळीत हंगामाच्या वेळी ज्या अडचणी आल्या त्या अडचणी वेळी मा.दत्ताभाऊ पा. गोर्डे यांनी जी मदत केली ती लाख मोलाची होती असे चेअरमन मा.श्री. तुषारभाऊ शिसोदे यांनी सांगितले यावेळी दत्ताभाऊ गोर्डे यांनी कारखान्याचे सभासद यांना दिवाळी निमित्त साखर वाटप करावी अशी मागणी केली लगेच सचिन भैय्या घायाळ यांनी मागणी मान्य करत सर्व सभासद यांना सुरवातीलाच साखर वाटप केली जाईल असे सांगितले यावेळी चेअरमन श्री.तुषार शिसोदे व सचिन शुगर चे चेअरमन श्री.सचिन घायाळ, पैठण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते तथा संपर्क प्रमुख श्री.दत्ताभाऊ पाटील गोर्डे,व्हाईस चेअरमन गोपीनाना गोर्डे, हरिभाऊ मापारी,आबासाहेब मोरे प्रल्हाद तात्या औटे ,दत्तात्रय आमले ,प्रकाश शिरसागर, दिगंबर तात्या गोर्डे, विजय गोरे, बद्री जिजा भुमरे, बद्री तात्या गोर्डे, काँग्रेस तालुकाध्यक्ष विनोदभाऊ तांबे ,राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पाटील निर्मळ, माजी नगराध्यक्ष अनिलजी घोडके, भाऊसाहेब पिसे, आप्पासाहेब गायकवाड, विशाल थोटे,सेवादल तालुकाध्यक्ष अनिल हजारे ,गणेश पवार ,पंकज चव्हाण ,संजीव कोरडे संदीप लाटे, किशोर दसपुते, अजय करकोटक, महेश नाना पवार ,संदीप लाटे, डॉक्टर गणेश मोहिते, अमोल घायाळ, सुनील घायाळ, दत्ता वाकडे,अशोक पा.एरंडे, संतोष खराद,राम चितळे, गायकवाड साहेब यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.