माजी महापौर मधुकरराव पवळे यांच्या पुण्यतिथी निमित्त महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील त्यांच्या प्रतिमेस महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण
पिंपरी चिंचवड,दि.24: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने माजी महापौर मधुकरराव पवळे यांच्या पुण्यतिथी निमित्त महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील त्यांच्या प्रतिमेस महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले यावेळी उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, आयुक्त राजेश पाटील, शहर सुधारणा समिती सभापती अनुराधा गोरखे, शिक्षण समिती सभापती माधवी राजापुरे, नगरसदस्या सुमन पवळे, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, उल्हास जगताप, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, महासंघ प्रतिनिधी धनाजी नखाते उपस्थित होते.
महापौर माई ढोरे यांनी निगडी येथील माजी महापौर मधुकरराव पवळे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला यावेळी उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, मनसे गटनेते सचिन चिखले, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती उत्तम केंदळे, शहर सुधारणा समिती सभापती अनुराधा गोरखे, शिक्षण समिती सभापती माधवी राजापुरे, नगरसदस्या सुमन पवळे, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, माजी नगरसदस्य शशिकिरण गवळी, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता रविंद्र पवार, तसेच सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
