विधानपरिषद निवडणूकीत बिनविरोध निवडून आलेले-सतेज उर्फ बंटी डी. पाटील यांना प्रमाणपत्र प्रदान

0 झुंजार झेप न्युज

विधानपरिषद निवडणूकीत बिनविरोध निवडून आलेले-सतेज उर्फ बंटी डी. पाटील यांना प्रमाणपत्र प्रदान

कोल्हापूर,दि.26: महाराष्ट्र विधान परिषद कोल्हापूर स्थानिक प्राधिकारी द्विवार्षिक निवडणूक 2021 मध्ये बिनविरोध निवडून आलेले उमेदवार सतेज उर्फ बंटी. डी. पाटील (पक्ष- इंडियन नॅशनल काँग्रेस) यांना निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी निवडणूक निरीक्षक तथा मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल(भाप्रसे), निवासी उपजिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी शंकरराव जाधव, ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, आमदार जयंत आसगावकर, आमदार ऋतुराज पाटील, आमदार राजेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्र विधान परिषद कोल्हापूर स्थानिक प्राधिकारी द्विवार्षिक निवडणूक 2021 साठी 5 उमेदवारांची 7 नामनिर्देशन पत्र दाखल झाली होती. यापैकी छाननीत 4 उमेदवारांची 6 नामनिर्देशनपत्रे वैध ठरली होती. अमल महादेवराव महाडिक (पक्ष- भारतीय जनता पार्टी), शौमिका अमल महाडिक (अपक्ष) व शशिकांत शामराव खोत (अपक्ष) या 3 उमेदवारांनी माघार घेतली आहे. महाराष्ट्र विधानपरिषद कोल्हापूर स्थानिक प्राधिकारी द्विवार्षिक निवडणुकीत सतेज उर्फ बंटी डी. पाटील विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी घोषित केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.