हर घर दस्तक अभियान यशस्वी करा-जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील

0 झुंजार झेप न्युज

हर घर दस्तक अभियान यशस्वी करा-जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील

रत्नागिरी,दि.11: लसीकरणासाठी प्रत्येकांपर्यंत पोहचा, यासाठी लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते यांची मदत घ्या. जे लसीकरणासाठी तयार नसतील त्यांना लसीकरणासाठी प्रोत्साहन द्या आणि जिल्हयाचे लसीकरण पूर्ण करा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. बी.एन. पाटील यांनी दिले

जिल्हाधिकारी कार्यालय सभागृह येथे लसीकरणांसंदर्भातील हर घर दस्तक अभियानांच्या जिल्हा कृती दल बैठकीत ते बोलत होते. हर घर दस्तक अभियान 03 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत राबविण्यात येत आहे. यावेळी प्रभारी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती घाणेकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये आदि संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

लसीकरणासंदर्भातील गावनिहाय यादी मागवून घ्या. ज्या ठिकाणी लसीकरणाचे प्रमाण कमी आहे, त्या गावांवर , ठिकाणावंर लसीकरणासाठी भर द्या. आवश्यक त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी, सामाजिके कार्यकर्ते यांची मदत घ्या आणि जास्तीत जास्त लसीकरण पूर्ण करा अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. बी.एन. पाटील यांनी यावेळी दिल्या.

ते म्हणाले पहिल्या डोसचे प्रमाण चांगले असून जे राहिलेले आहेत त्यांचे लसीकरण पूर्ण करुन घ्या. दुसऱ्या डोससाठी आवश्यक डाटा आपल्याकडे उपलब्ध आहे त्यानुसार शिबीरे लावून दुसरा डोसचे लसीकरणावर भर द्या, तेही पूण करा. या सर्व गोष्टींमध्ये ग्रामकृतीदल, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्येकर्ते यांची आवश्यक ती मदत घ्या.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुध्द आठल्ये यांनी यावेळी लसीकरणांसदर्भात आतापर्यंत करण्यात आलेल्या कामाची आणि या मोहिमेंतर्गत करण्यात येणाऱ्या कामाची माहिती दिली .

राष्ट्रीय क्षयरोग निर्मुलन कार्यक्रम बैठक-

जिल्हाधिकारी डॉ.बी.एन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय क्षयरोग निर्मुलन कार्यक्रम जिल्हास्तरीय बैठक संपन्न झाली. टीबी हारेगा देश जितेगा हे स्लोगन घेऊन ही मोहिम 15 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर 2021 या कालावधीत जिल्हयातील ग्रामीण व शहरी भागात राबविण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.