पुरंदर उपसा योजनेतून पाझत तलाव भरण्यात यावेत आमदार संजयजी जगताप

0 झुंजार झेप न्युज

पुरंदर उपसा योजनेतून पाझत तलाव भरण्यात यावेत आमदार संजयजी जगताप

पुरंदर,दि.15: पुरंदर तालुक्यात यंदा पाऊसाचे प्रमाण खूपच कमी असल्यामुळे पाणी साठ्यावर याचा परिणाम होवून विहीरीतील पाणी पातळी खूपच कमी झाल्याने शेतातील पीके करपू लागली .

पुरंदर हवेलीचे आमदार संजयजी जगताप यांनी पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी ठिकठिकाणचे पाझर तलाव पुरंदर उपसा योजनेतून भरण्यात याव्यात अशी लेखी सुचना प्रशासनास दिली असून प्रशासनाने खालील गावातील पाझर तलाव भरण्यासाठी सुरुवात केली .दिवे ,वनपुरी,आंबोडी ,कुंभारवळण,सिंगापूर,गुर्होळी,वाघापुर,टेकवडी,माळशिरस,नायगाव,पिसार्व ,पारगाव,पांडेश्वर,राजेवाडी,कोथळे,भोसलेवाडी,बेलसर या गावातील पाझर तलाव पुरंदर उपसा योजनेतून भरण्यात येणार असून पाणी शुल्क टंचाई निधीतून भरण्यात येणार आहे परंतू त्यास विलंब झाल्यास लोकसहभागातून हे शुल्क भरण्यात येईल,पण सध्या पाणी सोडण्याची सुचना आमदार संजयजी जगताप यांनी दिली,व त्याची तात्परतेने प्रशासनाने दखल घेतली.पाझर तलाव भरण्यास सुरुवात केली.शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.