शुभेच्छा दादांना अन् शुभचिंतन सुकन्यांचे आ. महेशदादांच्या वाढदिवसानिमित्त सौ. योगिताताई नागरगोजेंचा देखणा उपक्रम

0 झुंजार झेप न्युज

शुभेच्छा दादांना अन् शुभचिंतन सुकन्यांचे आ. महेशदादांच्या वाढदिवसानिमित्त सौ. योगिताताई नागरगोजेंचा देखणा उपक्रम

पूर्णानगर : योगिताताई तुमचे आभार मानावे तेवढे थोडे आहेत. माझ्या कन्येच्या उज्वल भविष्यासाठी आपण सुकन्या योजनेचा लाभ तीला मिळवून दिलात. आपण आ. महेशदादा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छांसाठी कार्यक्रम घेतलात पण शुभचिंतन व्यक्त केले सुकन्यांचे. अशी प्रतिक्रीया एका माऊलीने. नगरसेविका सौ. योगिताताई नागरगोजे यांचेपाशी बोलताना व्यक्त केली तेव्हां उपस्थित जनसमुदायाने देखिल उपक्रमाबद्दल धन्यताच व्यक्त केली.

भोसरीचे कार्यक्षम आमदार व पिंपरी चिंचवड शहर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष महेश दादा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेविका सौ. योगिताताई नागरगोजे यांची दहा वर्षाखालील मुलींना सुकन्या वीमा योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी उपक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी आधार कार्ड काढणे आणि अपडेट करणे अशा मेळाव्याचे देखिल आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याचे उद्घाटन आ. महेशदादा लांडगे यव देऊळ बंद चित्रपटामधील सर्वांची लाडकी बाल अभिनेत्री आर्या घारे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ज्ञानेश्वर नागरगोजे, दीपक नागरगोजे, तसेच सर्व प्रभागातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.