125 मेट्रिक टन क्षमतेच्या लिक्वीड मेडीकल ऑक्सीजन टँकचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

0 झुंजार झेप न्युज

125 मेट्रिक टन क्षमतेच्या लिक्वीड मेडीकल ऑक्सीजन टँकचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

नागपूर,दि.31: शहरातील शासकीय मनोरुग्णालयालगत जिल्हा रुग्णालय परिसरात 125 मेट्रिक टन क्षमतेचे लिक्वीड मेडीकल ऑक्सीजन टँकची निर्मिती करण्यात आली असून या ऑक्सीजन टँकचे लोकार्पण ऊर्जा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांचे हस्ते आज करण्यात आले. 

जिल्हाधिकारी आर. विमला, नागपूर सूधार प्रन्यासचे सभापती मनोजकुमार सुर्यवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. देवेंद्र पातूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माधूरी थोरात, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता विद्याधर सरदेशमुख, कार्यकारी अभियंता जनार्दन भानूसे, उपअभियंता श्री. गिरी यावेळी उपस्थित होते. 

मागील वर्षी कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटमुळे जनतेस अनेक समस्यांचा सामना करावा लागला. हॉस्पिटलमध्ये अपुऱ्या ऑक्सीजन सिलेंडरमूळे अनेकांना स्वत:चा प्राण गमवावा लागला. यावर्षात अशी परिस्थिती उद्भवु नये याची आगाऊ काळजी त्याचबरोबर जिल्ह्यात ओमिक्रॉन विषाणूच्या धोक्यापासून सुरक्षित राहण्यासाठी या ऑक्सीजन टँकमुळे जनतेस निश्चितच सोय होऊन अनेकाचे प्राण वाचविणे शक्य होणार, असल्याचे पालकमंत्री यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे संचालन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. देवेंद्र पातूरकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार अधीक्षक अभियंता विद्याधर सरदेशमुख मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.