नेहरूनगर, बालाजीनगर गांधीनगर येथील बहुसंख्य नागरिकांनी आज वंचित बहुजन आघाडी पिंपरी चिंचवड शहर मध्ये जाहीर प्रवेश
पिंपरी चिंचवड,दि.31: नेहरूनगर, बालाजीनगर गांधीनगर येथील बहुसंख्य नागरिकांनी आज वंचित बहुजन आघाडी पिंपरी चिंचवड शहर मध्ये जाहीर प्रवेश केला. मोरवाडी येथील पक्ष कार्यालयात संपन्न झालेल्या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात हा पक्ष प्रवेश संपन्न झाला...कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष मा. इंजि. देवेंद्र तायडे हे होते.
या वेळी उपस्थितांमध्ये वंचित बहुजन महिला आघाडी पिंपरी चिंचवड शहर अध्यक्षा मा.लता रोकडे,शहर कार्याध्यक्ष तथा माजी नगरसेवक अंकुश कानडी महिला आघाडी शहर उपाध्यक्षा निर्मला कांबळे, मीना वाघमारे, संगीता खरात,संघटक सुलभा हिंगे,कोषाध्यक्षा शारदा बनसोडे, महिला आघाडीच्या विनिता पाटील, रेखा वाघमारे तसेच वंचित बहुजन आघाडी पिंपरी चिंचवड शहराचे निरीक्षक तथा महासचिव मा. राजन नायर, उपाध्यक्ष धनंजय कांबळे, भारत कुंभारे, कचरू ओव्हाळ, सचिव राहुल बनसोडे, राजु चांदणे, माजी युवक अध्यक्ष गुलाब पानपाटील,प्रवीण कांबळे, ईश्वर कांबळे, लक्ष्मण शिंगाडे, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बालाजीनगर भोसरी येथील स्थानिक संध्या वडमारे, विद्या पवार, संगीता कसबे,पिंपळे गुरव येथील कविता मुडलियार आदी महिलांनी तर पिंपळेगुरव येथील हरिष मुडलियार गांधीनगर येथील अक्षय खडगे, अहमद शेख तर नेहरूनगर येथील बाबासाहेब कोल्हे यांनी देखील जाहीर प्रवेश केला ऑल इंडिया पॅंथर सेना महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष अजय चंद्रकांत गायकवाड यांनी देखील वंचित बहुजन आघाडी पिंपरी-चिंचवड शहरामध्ये जाहीर प्रवेश केला.
